Home /News /maharashtra /

Kirit Somaiya: बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळ्यातील अग्रवाल आणि शिवसेनेचे यशवंत जाधव भागीदार, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiya: बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळ्यातील अग्रवाल आणि शिवसेनेचे यशवंत जाधव भागीदार, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज एक पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

पुणे, 24 मे : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत ठाकरे कुटुंबीय आणि यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी म्हटलं, माफिया सरकारमध्ये महाराष्ट्राची जनता प्रश्न असं विचारत आहे की, सांगा ठाकरे पार्टनर कुणाचे? या सीझनचा हा पहिला एपिसोड आहे. इतरही एपिसोड मी पुढे मांडणार आहे. ठाकरे कुटुंब म्हणजे उद्धव ठाकरे असो, रश्मी ठाकरे असो, आदित्य ठाकरे असो, तेजस ठाकरे असो, रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर असो.. हे पार्टनर कुणा-कुणाचे आहेत. हे पार्टनर हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीचे आहेत की यशवंत जाधव यांचे आहेत?. यावर ठाकरेसाहेब बोलणार का, यशवंत जाधव यांच्यासोबत आपले व्यवसायिक, आर्थिक संबंध काय आहेत?. या सरकारमध्ये एनसीपी आणि शिवसेना माफिया आहेत. शरद पवार यांचे नवाब मलिक हे दाऊदचे पार्टनर तर उद्धव ठाकरे यांचे पार्टनर असलेल्यांचे संबंध कुणासोबत.. कसाबसोबत? मी जबाबदारीपूर्वक सांगत आहे, नवाब मलिकचे संबंध जर दाऊदपर्यंत पोहोचू शकतात. तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत असाही गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. वाचा : शिवसेनेच्या ऑफरवर संभाजीराजेंनी केलं मोठं विधान, "मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आणि..." उद्धव ठाकरेंचे व्यावसायिक संबंध, व्यवहार यशवंत जाधव यांच्यासोबत आहेत. यांचे संबंध ज्यांनी हेमंत करकरे यांची हत्या केली त्यांच्यासोबत आहे. हेमत करकरे यांनी परिधान केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट नकली होतं आणि त्यामुळेच करकरे यांचा मृत्यू झाला. बुलेटप्रूफ जॅकेट कुणी दिलं? तर ते सप्लाय केलं होतं विमल अग्रवाल याने... त्याची चौकशी झाली, कमिटी नेमली गेली, विमल अग्रवालला अटक झाली. तो विमल अग्रवाल याने बोगस बुलेटप्रूफ जॅकटचा सप्लाय पोलिसांना केला होता. यशवंत जाधव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली त्यावेळी विमल अग्रवालचं नाव समोर आलं होतं. तीन वेगवेगळ्या प्रकरणात यांची अटक झाली होती सध्या जामीनावर आहेत. पार्टनरची नावे पाहा, विमलकुमार अग्रवाल, किशोरकुमार रामगोपाल अग्रवाल आणि तिसरं नाव आहे यतीन यशवंत जाधव यांचं. हे यतीन हे यशवंत जाधव यांचा मुलगा आहे असंही सोमय्या म्हणाले. वाचा : राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली? मनसेने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण यशवंत जाधव आणि विमल अग्रवालची कंपनी कुठली तर समर्थ.... समर्थने 80 कोटींचा प्रोजेक्ट घेतला. समर्थचे कुणासोबत आर्थिक, व्यावसायिक संबंध आहेत तर श्रीधर पाटणकर यांच्यासोबत. श्रीधर पाटणकर यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा करणाऱ्याकडून टीडीआर घेतला असाही आरोप सोमय्यांनी केला. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरो केले आहेत. या आरोपांवर अद्याप शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. ही प्रतिक्रिया येताच बातमी अपडेट करण्यात येईल.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Kirit Somaiya, Pune

पुढील बातम्या