पुणे, 08 डिसेंबर: पुण्यातील (Pune) देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश (International sex racket) केला आहे. पोलिसांनी येथील एका लॉजवर छापेमारी (Raid at lodge) करत दहा महिलांची सुटका केली आहे. यामध्ये काही विदेशी आणि परराज्यातील तरुणींचा समावेश आहे. या छापेमारीत पोलिसांनी 25 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असून लॉज मालकासह मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. सामाजिक सुरक्षा पथक आणि अवैध मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
लॉजचा मॅनेजर गवी रंगा कृष्णा गोवडा (वय 38, रा. किवळे, मूळपत्ता भोईसर, मुंबई) आणि लॉजचा मालक प्रताप शेट्टी (वय 40, सध्या रा. कात्रज, मूळ उडपी, कर्नाटक) या दोघांविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रताप शेट्टी हा आपल्या लॉजमध्ये काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करत असल्याची गुप्त माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली होती.
हेही वाचा-नगर हादरलं! कॉलेजच्या गेटसमोरून केलं अपहरण; बळजबरीनं लग्न लावत युवतीवर बलात्कार
या गुप्त माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा पथक आणि अवैध मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत असणाऱ्या किवळे येथील व्दारका लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापेमारी केली आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी छापेमारी करत याठिकाणी सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
हेही वाचा-मुख्याध्यापकासह 4 शिक्षकांचा विद्यार्थीनीवर गँगरेप, शिक्षिकेने बनवला VIDEO
या छापेमारीत पोलिसांनी दहा तरुणींची सुटका केली असून यामध्ये एका परदेशी तरुणीसह 6 परराज्यातील आणि 3 महाराष्ट्रातील तरुणींचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून 11 हजार 400 रुपयांची रोकड, 14 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि 300 रुपये किमतीचं इतर साहित्य, असा एकूण 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी लॉजचा मालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Sex racket