मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : सावधान! पुण्याला स्वाईन फ्लूचा विळखा; धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी, पाहा VIDEO

Pune : सावधान! पुण्याला स्वाईन फ्लूचा विळखा; धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी, पाहा VIDEO

पुणे ( Swine Flu In Pune ) शहरांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते आतापर्यंत एकूण 45 लोकांना ( 45 People Infected ) स्वाईन फ्लूची बाधा झालेली आहे.

  पुणे, 28 जुलै : राज्यात कोरोनासह आता स्वाईन फ्लूचा ( Swine Flu ) धोका वाढतो आहे. राज्यात जानेवारी पासुन आत्तापर्यंत 173 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर पुणे ( Swine Flu In Pune ) शहरांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते आतापर्यंत एकूण 45 लोकांना ( 45 Infected ) स्वाईन फ्लूची बाधा झालेली आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे. काय आहेत स्वाईन फ्लूची लक्षणे? "कोरोना आणि स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे एकच असल्याने रुग्णाची कोरोना बरोबरच स्वाईन फ्लूची देखील तपासणी करता येते. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी ही स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत", अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी Local18 शी बोलताना दिली आहे. पुढे बोलताना डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, "कोविड आणि स्वाईन फ्लू या आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय एकच असून नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचं आहे".

   हेही वाचा- Nashik: आर्थिक परिस्थितीशी झगडत 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारनं सांगितला यशाचा मंत्र

  स्वाईन फ्लू पार्श्वभूमीवर पुण्यात प्रशासनची तयारी  "सध्याला पुण्यामध्ये स्वाईन फ्लूची लस उपलब्ध आहे. ती लस घेऊन आपण स्वाईन फ्लू पासून स्वतःचा बचाव करू शकता. डायबेटीस, हायपर टेन्शन, आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या वयस्कर लोकांनी ही लस घ्यावी. यामुळे त्यांना स्वाईन फ्लूचा धोका कमी होऊ शकतो. तसेच स्वाईन फ्लू झाल्यानंतर घाबरण्याची गरज नाही. योग्यवेळी योग्य उपचार केले तर लवकरात लवकर बरा होऊ शकतो", अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी Local18 शी बोलताना दिली आहे. स्वाईन फ्लूचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी  कोरोनासाठी जे नियम पाळले होते ते स्वाईन फ्लू साठी लागू होतात. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा. तसेच मास्कचा वापर करा. वेळोवेळी हात धुवा आणि फिजिकल डिस्टन्स ठेवावा. आदि खबरदारीची उपाययोजना केली तर स्वाईन फ्लू पासून आपले रक्षण होऊ शकते. तसेच कोणत्याही प्रकारचा ताप, सर्दी, खोकला असल्यास नजीकच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि योग्य वेळी उपचार करावे.

  गूगल मॅप वरून साभार...

  लक्षणे आढल्यास या ठिकाणी घ्या उपचार 

  कमला नेहरू शासकीय रुग्णालय, मंगळवार पेठ रोड, कसबा पोस्ट ऑफिस जवळ, गांधीनगर, मंगळवार पेठ, कसबा पेठ, पुणे, महाराष्ट्र 411002, या पत्त्यावर जाऊन उपचार घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 020 2550 8500 या नंबरवर संपर्क साधू शकतात.

  First published:

  Tags: Pune, Pune Muncipal corporation

  पुढील बातम्या