मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : आला पावसाळा, तुमचा जीव सांभाळा! 7 दिवसांमध्ये झाडं पडण्याच्या 100 घटना, पाहा VIDEO

Pune : आला पावसाळा, तुमचा जीव सांभाळा! 7 दिवसांमध्ये झाडं पडण्याच्या 100 घटना, पाहा VIDEO

पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy rainfall in Pune) सुरू आहे. 'नेमिची येतो मग पावसाळा' या म्हणीप्रमाणेच शहरात पावसाळ्यातील दरवर्षींच्या समस्यांनी डोकं वर काढलं आहे.

    पुणे, 13 जुलै :  पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy rainfall in Pune) सुरू आहे. 'नेमिची येतो मग पावसाळा' या म्हणीप्रमाणेच शहरात पावसाळ्यातील दरवर्षींच्या समस्यांनी डोकं वर काढलं आहे. शहरामध्ये  गेल्या आठवडाभरात  झाडपाडीच्या 100 घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळणे, भिंती कोसळणे या प्रकारामुळे पुणेकर त्रस्त असतानाच झाडं पडण्याच्या घटना घडल्यानं त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर त्यांना आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागतोय. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका! पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करणे आवश्यक असते. महापालिका प्रशासनाकडून धोकादायक झाडांची छाटणी केल्याची नोंद देखील आहे. पण पावसाळा सुरू होताच पालिकेच्या या दाव्याची 'पोलखोल' झाली आहे. ही झाडं पडल्यानंतर सर्वात प्रथम अग्निशमन दलाचे (Fire Brigade) अधिकारी घटनास्थळी दाखल होतात. आम्ही या प्रकरणात अग्निशमन स्टेशन अधिकारी प्रकाश गोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी 'पाऊस सुरू झाल्यापासून शहरामध्ये झाडं पडण्याच्या घटनांंमध्ये वाढ झाली आहे, हे मान्य केले. पुणे शहरात झाड पडण्याच्या घटनांबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी भिंत पडणे, दरड कोसळणे, शॉर्ट सर्किट होणे, रस्त्यावर ऑईल सांडणे या प्रकारामुळे देखील अपघात होत आहेत. या अपघाताच्या ठिकाणी पोहचण्यासाठी आमच्यातडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तसंच वाहनांची संख्या देखील कमी आहे. पावसळ्याात या प्रकराचे अपघात जास्त होतात. अग्निशमन दल सर्वत्र वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे आम्ही उद्यान विभागाची मदत घेतो. पण ही मदत देखील अपुरी पडते.' असे गोरे यांनी सांगितले. Pune : भुकेलेल्या गरिबांसाठी पुण्याचे तरुण धावले, सुरू केला स्तुत्य उपक्रम; घरपोच देतायत अन्न, पहा VIDEO 'आम्हाला घटनास्थळी असंख्य अडचणी येतात. झाडं पडल्यानंतर अनेकदा शॉर्ट सर्किटच्या देखील घटना घडतात. त्यावेळी  आम्हाला आमच्या जीवाची भीती देखील असते. मात्र त्याची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो,' असे फायर ब्रिगेडचे जवान नितिन उंबरकर यांनी सांगितले. पुढे काय? अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण आणि त्यांच्या प्रयत्नानंतर पुणेकरांच्या अडचणी कायम आहेत. पावसळ्यातील पहिल्याच महिन्यांत घडलेल्या घटना हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत. त्यामुळे पावसळ्यातील उर्वरित महिन्यांमध्ये काय होणार ही भीती पुणेकरांमध्ये कायम आहे. कुठे कराल संपर्क? तुमच्या घराजवळ किंवा परिसरामध्येही झाड पडण्याची घटना घडली, तर मदतीसाठी अग्निशमन दलाच्या 101 या क्रमांकावर संपर्क करावा.
    First published:

    Tags: Pune, Pune (City/Town/Village), Rain

    पुढील बातम्या