Home /News /maharashtra /

Pune Special Report : पावसाळी कपड्यांच्या खरेदीला लागले पुणेकर! रेनकोट, छत्र्यांचे दर इतक्या रुपयांनी वाढले 

Pune Special Report : पावसाळी कपड्यांच्या खरेदीला लागले पुणेकर! रेनकोट, छत्र्यांचे दर इतक्या रुपयांनी वाढले 

पावसाळी

पावसाळी कपड्यांचा बाजार, पुणे

पावसाळा आला की, छत्री-रेनकोट खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होते. पुण्याच्या बाजारात या वर्षी विविध ब्रॅण्डचे खूप व्हरायटी असलेले रेनकोट आलेले आहेत. ते खरेदी करण्यासाठी पुणेकरांची बाजारात गर्दी होताना दिसत आहे.

    पुणे, 16 जून : पावसाळा आल्यानंतर नकोट, छत्री आणि इतर तत्सम वस्तू (Umbrellas and Raincoats) खरेदी करण्याची सर्वांत पहिल्या तयारी सुरू होते. मुलांची शाळा सुरू झालेली असते, त्यामुळे पालकांची आणि मुलांचा बाजारात पावसाळी कपडे, शूज खरेदी करण्यासाठी गर्दी होते. बाजारातदेखील नवनवीन व्हरायटी आलेल्या असतात. रंगीबेरंगी जॅकेट, कोट, रेनकोट, छत्री बाजारात पाहाययला मिळतात. पुण्याच्या बाजारात अशीच पालकांची आणि मुलांची गर्दी पाहायला मिळत आहे. (Prices of umbrellas and raincoats) या विषयासंदर्भात विक्रेते प्रथमेश शहा सांगतात की, "सध्याला मुलींच्या कपड्यांमध्ये निऑन कलरचे गुलाबी, हिरवे, लाल... अशा आकर्षक रंगसंगतीचे रेनकोट तर बाजारात आहेतच. यासोबतच फॅशन स्टेटमेंट म्हणून शॉर्ट जॅकेट, स्कर्ट ट्राऊझरदेखील सध्या मुलींना आवडतील असे पेहराव पावसाळ्यासाठी उपलब्ध आहेत. तर मुलांमध्ये नेहमीप्रमाणे जॅकेटचा आहेत. यासोबतच पावसाळी ट्राऊजर, जॅकेट याच्यामध्ये देखील विविधता आहे. पावसाळ्यामध्ये आकर्षक रंगसंगती आणि फिटिंगला देखील व्यवस्थित बसेल अशी कपडे सध्या उपलब्ध आहेत. शाळकरी मुलांसाठी देखील त्यांना आवडतील असे कार्टूनचे डिजाईनचे रेनकोट आहेत. काही जण आवडीने छत्री देखील घेताना, त्यासाठी छोटा भीम असुदे, शिन चॅन असू दे की, आताची नवीन आलेले कार्टून असो त्यांच्या डिझाईनच्या छत्र्या आणि रेनकोट उपलब्ध आहे. त्यासोबतच पावसाळी सॅकलादेखील मोठी मागणी आहे." वाचा : Mumbai : बाजारात रेनी शूज दाखल, किती रुपयांना होतेय विक्री? पहा VIDEO पोंचू रेनकोटला ग्राहकांकजून जास्त मागणी यावर्षी पावसाळ्यामध्ये पोंचू म्हणजेच इरलं प्रकारचा रेनकोट सध्या बाजारात आहे. हा रेनकोट अतिशय कम्फर्टेबल असून 250 रुपयांपासून याची किंमत सुरू होते. रेनकोटला बटण असतात किंवा चैन असते. यामुळे अनेकदा पाणी झिरपून कपडे खराब होतात. याची भीती पोंचूमुळे राहत नाही. या पोंचुला सध्या सगळ्यात जास्त मागणी आहे. पोंचू अतिशय कम्फर्टेबल असून याची किंमत देखील फार कमी आहे. तो सगळ्या साईजच्या लोकांना अगदी आरामशीर बसतो. वाचा : Akola Special Report : शेतकामांना वेग! पावसाच्या तोंडावर बाजारात दोरखंडाची वाढली मागणी दणकट आणि महाग छत्र्यांनाही मागणी  सध्या बॅगसाठीच्या कव्हरला देखील मागणी आहे. एवढेच नाही तर अनेकदा पावसाळ्यामध्ये आपल्याला मोबाईल भिजण्याचे प्रकार घडतात. हे होऊ नये म्हणून सध्या गळ्यात लटकवता येतील अशी मोबाईल कव्हर बाजारात उपलब्ध आहे. हे झिपलॉक असल्यामुळे यामध्ये मोबाईल ठेवला तरी मोबाईलमध्ये पाणी शिरत नाही. आणि पावसातदेखील तुम्ही तुमचा मोबाईल ऑपरेट करू शकता. यासोबतच पावसामध्ये अनेकदा भरपूर वारा आला तर छत्री उलटी होण्याचे प्रकार होतात. ते होऊ नये म्हणून खास भक्कम अशा स्ट्रोकची छत्री बाजारात उपलब्ध आहे. तीची किंमत साधारण छत्रीपेक्षा थोडीशी महाग म्हणजेच 500 रुपये आहे. हेअरबँडवाली छत्रीदेखील सध्या बाजारात आहे. ती लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त आवडीने वापरली जात आहे. तसेच छोट्या फोल्डिंग छत्री, सोबतच सध्याला थोडा मोठा लांब दांड्याची छत्रीदेखील लोक आवडीने घेत आहेत.
    First published:

    पुढील बातम्या