मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंघोळ करणाऱ्या महिलेसोबत सुरक्षा रक्षकाचं अश्लील कृत्य, पुण्यातील धक्कादायक घटना

अंघोळ करणाऱ्या महिलेसोबत सुरक्षा रक्षकाचं अश्लील कृत्य, पुण्यातील धक्कादायक घटना

(File Photo)

(File Photo)

Crime in Pune: पुण्यातील आयबीच्या शासकीय निवासस्थानात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका सुरक्षा रक्षकानं गेस्ट हाऊसमध्ये अंंघोळ करणाऱ्या महिलेसोबत अश्लील कृत्य केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 23 नोव्हेंबर: पुणे स्टेशन परिसरात असलेल्या इन्स्पेक्शन बंगलोच्या शासकीय निवासस्थानात (Guest House) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका सुरक्षा रक्षकानं गेस्ट हाऊसमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेसोबत अश्लील कृत्य केलं आहे. आरोपीनं संबंधित महिलेचा अंघोळ करताचा अश्लील व्हिडीओ शूट (Security guard shoot obscene video) करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित संतापजनक प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने महिलेनं मदतीसाठी आरडाओरड केली. यावेळी आसपास असणाऱ्या लोकांनी आरोपीला सुरक्षा रक्षकाला पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक  (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय पीडित महिला पुणे स्टेशन परिसरात असलेल्या आयबीच्या गेस्ट हाऊसमधील एका रुममध्ये थांबल्या होत्या.

हेही वाचा-पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...

दरम्यान पीडित महिला बाथरुममध्ये अंघोळ करण्यासाठी गेल्या असता, नराधम आरोपीनं पीडित महिला अंघोळ करत असलेल्या बाथरुमच्या खिडकीजवळ जाऊन त्यांचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पीडित महिलेचं खिडकीकडे लक्ष गेलं असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा-तपासणीसाठी आलेल्या महिलेनं केला गेम; हनी ट्रॅपमध्ये अडकवत डॉक्टरकडून उकळले 2 लाख

सुरक्षा रक्षक खिडकीतून व्हिडीओ शूट करत असल्याचं कळताच, पीडित महिलेनं त्वरीत आरडाओरड करत मदत मागितली. यावेळी गेस्ट हाऊस परिसरात असणाऱ्या काही लोकांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला पकडून बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केलं आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Pune