मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्नात झालेल्या वादाची 3 वर्षांनी आली आठवण; पुण्यातील तरुणाने बुक्की मारून पत्नीचा पाडला दात

लग्नात झालेल्या वादाची 3 वर्षांनी आली आठवण; पुण्यातील तरुणाने बुक्की मारून पत्नीचा पाडला दात

Crime in Pune: पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने तीन वर्षांपूर्वी लग्नात फोटोग्राफर्समध्ये झालेल्या वादाचा राग आपल्या पत्नीवर काढला आहे.

Crime in Pune: पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने तीन वर्षांपूर्वी लग्नात फोटोग्राफर्समध्ये झालेल्या वादाचा राग आपल्या पत्नीवर काढला आहे.

Crime in Pune: पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने तीन वर्षांपूर्वी लग्नात फोटोग्राफर्समध्ये झालेल्या वादाचा राग आपल्या पत्नीवर काढला आहे.

पुणे, 31 डिसेंबर: पुण्यातील (Pune) खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने तीन वर्षांपूर्वी लग्नात फोटोग्राफर्समध्ये झालेल्या भांडणाचा राग आपल्या पत्नीवर काढला आहे. आरोपी तरुणाने पत्नीला बेदम मारहाण (Husband beat wife) करत तिच्या तोंडावर बुक्की मारून तिची दाढ पाडली (husband cracked wife's teeth) आहे. या मारहाणीत पीडित पत्नीचा जबडा देखील फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेनं पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused husband arrested) केली आहे.

कौस्तुभ दीपक खरबस असं अटक झालेल्या आरोपीचं नाव असून तो पुण्यातील गुरुवार पेठेतील सीटी अपार्टमेंटमधील रहिवाशी आहे. तर आकांक्षा कौस्तुभ खरबस असं 27 वर्षीय फिर्यादी विवाहितेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती कौस्तुभ आणि फिर्यादी आकांक्षा यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या लग्नात वधू आणि वराकडील मंडळींनी दोघांनी आपापले फोटोग्राफर्स  बोलावले होते. यावेळी लग्नात फोटो काढण्यावरून संबंधित फोटोग्राफर्समध्ये वाद झाला होता.

हेही वाचा-लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव, नगरमधील मन हेलावणारी घटना

यावेळी फिर्यादी आकांक्षाच्या भावाने मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. पण सहा महिन्यांपूर्वी संबंधित दोन्ही छायाचित्रकार पुन्हा एकदा एका वेगळ्याच लग्नात आमने सामने आले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याची माहिती कौस्तुभला मिळाली. त्यामुळे त्याने आपल्या जुना वाद पुन्हा उकरून काढला. आरोपी पतीने आकांक्षाला बेदम मारहाण केली आहे.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीसोबत क्रूरतेचा कळस, रेपनंतर पिरगळली मान, राज्याला हादरवणारी घटना

घटनेच्या दिवशी 17 डिसेंबर रोजी आरोपी पती कौस्तुभ याने पाण्याने भरलेली बाटली पत्नीला फेकून मारली. त्यानंतर आरोपीनं भिंतीची प्लास्टर लेव्हल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉटम पट्टीने आणि हाताने पीडितेला मारहाण केली. यावेळी त्याने एक ठोसा पत्नीच्या तोंडावर देखील मारला. यामुळे पत्नीची दाढ पडली आहे. तसेच तिचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर पीडित महिलेनं खडक पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांनी मारझोड्या पतीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune