Home /News /maharashtra /

पतीचा खून केला आणि मृतदेहाला फासावर लटकावले, पत्नीच्या कृत्याने पोलीसही हैराण

पतीचा खून केला आणि मृतदेहाला फासावर लटकावले, पत्नीच्या कृत्याने पोलीसही हैराण

घरगुती वादातून पतीने आपल्या पतीचा खून केला आणि त्याने आत्महत्या केला असल्याचा बनाव रचला.

घरगुती वादातून पतीने आपल्या पतीचा खून केला आणि त्याने आत्महत्या केला असल्याचा बनाव रचला.

घरगुती वादातून पतीने आपल्या पतीचा खून केला आणि त्याने आत्महत्या केला असल्याचा बनाव रचला.

    पुणे, 08 जून : घरगुती भांडणं विकोपाला गेली, की त्यातून अनर्थ घडतात. आजवर अशी अनेक उदाहरणं घडली आहेत, मात्र जे झालं, ते कबूल करण्याऐवजी पळ काढण्याकडे काही जणांचा कल असतो. पुण्यातील ताथवडे इथेही सोमवारी (6 जून 22) असंच नाट्य घडलं. घरगुती वादातून पतीने आपल्या पतीचा खून केला आणि त्याने आत्महत्या केला असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर बुधवारी (8 जून 22) त्यातील सत्य समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ताथवडे (Tathawade, Pune) येथे राहणाऱ्या आपल्या पतीची हत्या करून (Woman Kills Husband) ती आत्महत्या असल्याचं भासवणाऱ्या पत्नीवर बुधवारी वाकड पोलिसांनी कारवाई केली. अनिल उत्तमराव राठोड (वय 35) (Anil Uttamrao Rathod) असं या प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव असून, त्याची पत्नी उषा राठोड हिच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे. (ह्रता दुर्गुळे Instagram वर टॉपक्लास ! 2.5M Followers असणारी पहिली मराठी स्टार) अनिल यांचे भाऊ रविकुमार यांनी त्याबाबत मंगळवारी वाकड पोलीस (Wakad Police Station) स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनिल आणि त्याची पत्नी उषा यांचं त्यादिवशी भांडण झालं होतं. भांडणादरम्यान उषाने पतीला कठीण वस्तूने मारलं. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे 2 वाजेच्या सुमाराला तिने ही आत्महत्या असल्याचा बनाव रचला. पती अनिल राठोड याच्या मृतदेहाला गळफास लावून लटकवलं आणि त्याने आत्महत्या केल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या बनावाबाबत अनिलचा भाऊ रविकुमार याला संशय आला असावा. त्याने दुसऱ्याच दिवशी त्याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली. (तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय युनिकॉर्न कंपनी) या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी उषा राठोड हिच्यावर गुन्हा नोंदवला. ही आत्महत्या नसून, खून असल्याचं समोर येताच पोलिसांनी कलम 302 अंतर्गत कारवाई केली. या पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अनिल राठोडचा खून केवळ घरगुती भांडणांतून झाला की, त्यामागे आणखीही काही कारणं आहेत, हे पोलिसांच्या तपासातून समोर येईल. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    First published:

    पुढील बातम्या