मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune: किरकोळ वादातून नवऱ्याचं राक्षसी कृत्य; डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीला दिला भयंकर मृत्यू

Pune: किरकोळ वादातून नवऱ्याचं राक्षसी कृत्य; डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीला दिला भयंकर मृत्यू

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी याठिकाणी एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife's brutal murder) केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पिंपरी, 23 नोव्हेंबर: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) याठिकाणी एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife's brutal murder) केल्याची घटना समोर आली आहे.  आरोपीनं कौटुंबीक वादातून (Family disputes) पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा (Crushed head with stone) घालून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता, की पत्नी जागीच निपचित पडून राहिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला अटक (Accused husband arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जिनाब अजमुद्दीन चाकोरे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर अजमुद्दिन अल्लाउद्दीन चाकोरे असं अटक केलेल्या 38 वर्षीय पतीचं नाव आहे. दोघंही पिंपरी परिसरातील नेहरूनगर परिसरात वास्तव्याला होते.

हेही वाचा-पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...

गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये घरगुती कारणावरून सतत वाद होतं होता. आज सकाळी देखील दोघांमध्ये घरगुती कारणातून वाद झाला. किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर आरोपी पतीनं राक्षसी कृत्य केलं आहे. आरोपी पतीने घरातील दगडी पाटा पत्नीच्या डोक्यात घालून तिची निर्घृण हत्या केली आहे.

हेही वाचा-अंगावरील हळद उतरण्याआधीच पुसलं कुंकू; लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवानं दिला जीव

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी जिनाब यांना  रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. पोलिसांनी तातडीनं जिनाब यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून जिनाब यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune