मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्वयंपाक नीट न केल्याने नवऱ्याची सटकली; उच्चशिक्षित पत्नीच्या पाठीला घेतला कडकडून चावा, पुण्यातील घटना

स्वयंपाक नीट न केल्याने नवऱ्याची सटकली; उच्चशिक्षित पत्नीच्या पाठीला घेतला कडकडून चावा, पुण्यातील घटना

Representative Image

Representative Image

Crime in Pune: पिंपरी चिंचवड परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने स्वयंपाक नीट केला नाही म्हणून आपल्या पत्नीच्या पाठीला कडकडून चावा घेतला (husband bite wife for not cooked well) आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 23 डिसेंबर: घरगुती कारणातून पती पत्नीमध्ये वाद होणं (Husband wife hussle) ही काही नवीन गोष्ट नाही. संसाराचा गाडा हाकताना छोट्या मोठ्या कारणातून नवरा बायकोमध्ये भांडणं होतच असतात. पण अनेकदा अशा भांडणाचं रुपांतर कौटुंबीक हिंसाचारात (Domestic violence) होतं. आतापर्यंत अशा हजारो बातम्या समोर आल्या आहेत. पण पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने स्वयंपाक नीट केला नाही म्हणून आपल्या पत्नीच्या पाठीला कडकडून चावा (husband bite wife for not cooked well) घेतला आहे.

या प्रकारानंतर पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत, आपल्या 56  वर्षीय पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून पोलीस अधिकारी देखील चक्रावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला पोलीस ठाण्यात बोलावून दोघांची समजूत घालून दोघांमधील वाद मिटवला आहे.

हेही वाचा-जादूटोण्याच्या संशयातून पतीचं पत्नीसोबत विचित्र कृत्य; भयावह अवस्थेत आढळली महिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 56 वर्षीय आरोपी आपल्या पत्नीसह पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्याला आहे. दोघंही उच्चशिक्षित आहेत. घटनेच्या दिवशी पत्नीने स्वयंपाक नीट केला नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. यातून संताप अनावर झाल्याने 56 वर्षीय पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही. तर त्याने आपल्या पत्नीच्या पाठीला चक्क कडकडून चावा घेतला आहे.

हेही वाचा-घराबाहेर पडला होता पत्नीचं शिर कापलेला मृतदेह; ते दृश्य पाहून नागरिक हादरले!

आरोपीनं घेतलेला चावा इतका जोरात होता की पत्नीच्या पाठीला जखम झाली आहे. अखेर पतीचा त्रास सहन न झाल्याने पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तिने भोसरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. घडलेला प्रकार ऐकून पोलीसही हैराण झाले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला पोलीस ठाण्यात बोलावून दोघांची समजूत घातली आहे, अशी माहिती भोसरी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Pimpri chinchawad, Pune