Home /News /maharashtra /

Pune : ग्राहकांनो सावधान! ओरिजनल सिल्क कसे ओळखाल? फसवणूक केलीच तर विक्रेत्यास 'इतक्या' वर्षांची होते शिक्षा

Pune : ग्राहकांनो सावधान! ओरिजनल सिल्क कसे ओळखाल? फसवणूक केलीच तर विक्रेत्यास 'इतक्या' वर्षांची होते शिक्षा

title=

दुकानदार ओरिजनल सिल्क म्हणून ग्राहकांची माथी दुसरेच कापड मारतात. अशा आपली फसवणूक झाली आहे, हेदेखील ग्राहकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण घेतलेले सिल्क ओरिजनल आहे का, हे ओळखण्याासाठी काही ट्रिक्स आहेत.

    पुणे, 30 जून : बऱ्याचदा कपडे खरेदी करायला गेल्यानंतर बाजारांमध्ये सिल्कच्या नावाखाली ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. ही फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून जसा अस्सल सोन्याची ओळख व्हावी म्हणून हॉलमार्क असतो. तसाच प्युअर सिल्कच्या वस्त्रांसाठी सिल्क मार्क (Silk Mark) केंद्र सरकारकडून दिलेला असतो. तर, हा सिल्क मार्क कसा असतो, त्याची ओळख कशी पटवायची आणि जर आपली फसवणूक झाली असेल तर याबाबत दाद कशी आणि कुठे मागायची या विषयाची आपण माहिती जाणून घेऊया... (Identify Original Silk by Silk Mark) वाचा : ‘आमचा पक्षच खरा शिवसेना’, शिंदे गटाचा दावा! संजय राऊतांना दिला ‘रोखठोक’ सल्ला ओरिजनल सिल्कच्या वस्त्राला सिल्क मार्क असतो. सिल्क मार्क ऑफ इंडियाकडून हा मार्क सिल्कच्या विणकर आणि विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला जातो. यामुळे वस्त्रांसाठी वापरले जाणारे सूत देखील प्युअर असते. ओरिजनल सिल्क अनेक वर्षं चांगले राहते, यामुळे या सिल्कची किंमत देखील जास्त असते. प्रत्येक सिल्कच्या साडीला सिल्क मार्क स्टिकर असतो. जे विणकर अथवा विक्रेते सेंटर गव्हर्मेंट नोंदणीकृत असतात, त्यांना सिल्क मार्कचा नंबर मिळतो. या मार्कवर एक क्यूआर कोड असतो. तो स्कॅन केल्यावर तो सिल्कमार्क कुणाच्या नावावर आहे ते समजते. ओरिजनल सिल्क स्वस्त नसते "ओरिजनल सिल्कचे एकूण महत्त्वाचे 5 प्रकार आहेत. कोरा सिल्क, मलबरी सिल्क, टसर सिल्क, कतान सिल्क, घिचा सिल्क हे ते 5 प्रकार आहेत. काही वेळेस एक-दोन हजारांच्या साड्यादेखील दुकानदार सिल्कच्या साड्या आहेत, म्हणून ग्राहकांच्या माथी मारतात. खरं तर एक किलो कच्च्या सिल्कची किंमत 7 हजार रुपये असते. त्या कच्च्या सिल्कमधून पाव किलो मळ आणि कोटिंग धुऊन काढला जातो, म्हणून 750 ग्रॅम सिल्कच विणकारांना उपलब्ध होते. यामुळे जर कोणता दुकानदार तुम्हाला 2 हजार रुपयांना प्युअर सिल्कच्या नावाखाली फसवत असेल, तर वेळी सावध व्हा. कारण कोणतेही सिल्क प्युअर असेल तर ते स्वस्त नसते", अशी माहिती अनघा घैसास यांनी दिली. वाचा : pune water crisis : पुणेकरांनो पाणी जपून वापरा दीड महिनाच पुरणार पाणी? जर फसवणूक झाली तर काय कराल? काही दुकानदार सिल्कच्या नावाने दुसरेच कोणते तरी कापड ग्राहकांच्या माथी मारतात. अशावेळी या कापडाबद्दल संशय आला, तर प्रत्येक शहरात सिल्कचे सेंटर ऑफिस असते. तेथे ते वस्त्र तपासून पाहू शकता. जर त्या वेळेस असे आढळले की, आपल्याला सिल्कच्या नावाखाली चुकीचे वस्त्र देऊन फसवणूक केली आहे. तर आपण त्या साडीचा सिल्कमार्क, खरेदी पावती घेऊन एफआयआर दाखल करू शकता. आणि दोष सिद्ध झाल्यास अशा विक्रेत्याला 3 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा मिळते.
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या