पुणे, 23 नोव्हेंबर: हॉटेलमधून फुकट बिर्याणी (Free biryani) न दिल्याच्या कारणातून तीन तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्यानं प्राणघातक (Scythe attack on hotel manager) हल्ला केला आहे. या हल्ल्यात हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी (Hotel manager injured) झाला असून हॉटेलचंही बरंच नुकसान झालं आहे. ही घटना घडल्यानंतर, हॉटेल चालकानं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण सोनवणे याचं पुण्यातील हिंगणे खुर्द परिसरात स्वत:च्या मालकीचं हॉटेल आहे. संबंधित हॉटेलमध्ये बिरास्वर दास हे मॅनेजर म्हणून काम करतात. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास सोनवणे यांच्या हॉटेलवर तीन तरुण आले होते. संबंधित तरुणांनी हॉटेल मॅनेजर बिरास्वर दास यांच्याकडे फुकट बिर्याणी देण्याची मागणी केली.
हेही वाचा-शिवसेना आमदाराला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीला राजस्थानातून अटक
पण हॉटेल मॅनेजरनं आरोपींच्या दबावाला न जुमानता, बिर्याणी देण्यास नकार दिला. फुकट बिर्याणी देण्यास नकार दिल्याच्या कारणातून आरोपीनं मॅनेजरवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात हॉटेल मॅनेजर बिरास्वर दास हे गंभीर जखमी झाले आहे. आरोपी तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी हॉटेलमधील अनेक वस्तूंची तोडफोड केली आहे. आरोपींनी मॅनेजरच्या हातावर कोयत्याने वार केल्यानंतर, काऊंटरवरील कॉम्प्युटर आणि फ्रिजवरही कोयत्याने घाव घालत नुकसान केलं आहे.
हेही वाचा-पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...
ही घटना घडत असताना फिर्यादी हॉटेल मालक लक्ष्मण सोनवणे बाहेर उभे होते. भांडणाचा आवाज आल्यानंतर ते धावत हॉटेलमध्ये आले. याप्रकरणी हॉटेल चालकानं बाळा, तेजा आणि सत्या वानखेडे या तीन तरुणांविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune