Home /News /maharashtra /

Weather Update : पुणेकरांना अलर्ट; 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा, पुढचा आठवडा जोरदार पावसाचा!

Weather Update : पुणेकरांना अलर्ट; 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा, पुढचा आठवडा जोरदार पावसाचा!

हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्हा परिसरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

    मुंबई, 2 जुलै : राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली आहे. काल आणि परवा मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर यानंतर आता पुण्याबाबतही हवामान खात्याने पावसाचा (IMD on Pune Rain) अंदाज वर्तवला आहे. पुण्यात होणार चांगला पाऊस - येत्या 48 तासांत ओरिसा आणि लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसात पुणे जिल्हा आणि पुणे शहर या ठिकाणी 5 तारखेच्या संध्याकाळपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे. हवामाने खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा - 24व्या वर्षीच विदर्भाच्या दीपकचा अटकेपार झेंडा, ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवणारा बनला देशातील पहिला वकील हवामान खात्याने याठिकाणी दिला ऑरेंज अलर्ट - इतकेच नव्हे तर पुढील ४८ तास कोकण आणि अंतर्गत भागात मान्सून राज्यात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तसेच 4 जुलै, सोमवारपासून कोकण, राज्याच्या अंतर्गत भागात आणि विदर्भाच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि कोकणात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD, IMD FORECAST, Pune rain, Rain

    पुढील बातम्या