मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दौऱ्याचं वेळापत्रकही ओक्केच! धावत्या दौऱ्यामुळे तानाजी सावंत झाले ट्रोल, नियोजन पाहून तुम्हालाही येईल चक्कर!

दौऱ्याचं वेळापत्रकही ओक्केच! धावत्या दौऱ्यामुळे तानाजी सावंत झाले ट्रोल, नियोजन पाहून तुम्हालाही येईल चक्कर!

तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने सावंत यांची चांगलीच पंचाईत झाली.

तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने सावंत यांची चांगलीच पंचाईत झाली.

तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने सावंत यांची चांगलीच पंचाईत झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 27 ऑगस्ट : शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. पावसाळी अधिवेशनामध्ये डासांच्या प्रश्नावर गोंधळलेले तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) आता आपल्या धावत्या दौऱ्यावरून चांगलेच ट्रोल झाले आहे. सावंत यांच्या पुणे दौऱ्यात तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने चांगलेच ट्रोल झाले.

त्याचं झालं असं की, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंत्री आणि आमदार आपआपल्या मतदारसंघात रवाना झाले. तानाजी सावंत हे पुण्याला रवाना झाले. त्यामुळे त्यांचा खास दौरा प्लॅन करण्यात आला. गुरुवार 25 ऑगस्ट ते रविवार 28 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. पण, या दौऱ्यामध्ये शुक्रवारी पुण्यात कार्यक्रमाचे असं काही भन्नाट नियोजन करण्यात आलं आहे की ते पाहून तुमचंही डोकं गरागरा फिरायला लागले.

सकाळी 11 वाजता कात्रज येथून निघालेले तानाजी सावंत यांचा दौरा 3 वाजेपर्यंत पुणे कार्यालयात पोहोचला. त्यानंतर दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत बालाजी नगर पुणे कार्यालय येथून कात्रज, पुणे कार्यालय. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत कात्रज पुणे कार्यालय येथून कात्रज, पुणे कार्यालयाकडे, असा आयोजित केला. अखेरीस रात्री 8 वाजता बालाजीनगर पुणे कार्यालय येथून कात्रज, पुणे निवास्थानाकडे प्रयाण. असा काही पहिल्या दिवसाचा दौरा आखला.

आता पहिल्या दिवशीचा दौरा असू शकतो, पण दुसऱ्या दिवशीही तानाजी सावंत यांचा दौरा हा याच क्रमाणे होता. हद्द तर तेव्हा झाली, सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे, 28 ऑगस्ट रोजीही तानाजी सावंत यांच्या या धावत्या दौऱ्याचे नियोजन असेच कऱण्यात आले आहे. त्यामुळे घर ते कार्यालय असा कोणता दौरा आहे, असा प्रश्नच सोशल मीडियावर तमाम मंडळींना पडला आहे.

(दसरा मेळाव्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक, शिंदे गटावर केला गंभीर आरोप)

अखेरीस आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे दौऱ्य़ाच्या वेळापत्रकामुळे चांगलेच ट्रोल झाले. तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने सावंत यांची चांगलीच पंचाईत झाली. शेवटी या धावत्या दौऱ्याचे वेळापत्रकच बदलून खाजगी, राखीव अशी नोंद करून पुन्हा वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

First published:

Tags: Lokmat news