मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल, 100 पैकी 92 प्रश्न फोडले!

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल, 100 पैकी 92 प्रश्न फोडले!

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

आरोग्य विभागातील गड ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षा पार पडली. पण, पेपर सुरू होण्याआधी १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते.

पुणे, 27 नोव्हेंबर :  आरोग्य विभागात (Maharashtra health department recruitment 2021) मोठा गाजावाजा करत परीक्षा घेण्यात आली होती. पण हॉल तिकीट आणि पेपर फुटीचा (Health Department Recruitment exam)  प्रकार समोर आला होता. पण आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आरोग्य परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांकडे (cyber police pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्राथमिक चौकशीत 100 पैकी 92 प्रश्न एकसारखे आढळून आले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोग्य विभागातील गड ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षा पार पडली. पण, पेपर सुरू होण्याआधी १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस स्टेशनमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगातला पहिला 18GB RAM असणारा Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

दरम्यान, परीक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे घोळ झाला होता. मात्र आता यावर तोडगा काढण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-क (Maharashtra health department Exam group C) संवर्गातील पदे भरण्यासाठीचे मे.न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांचेमार्फत दिनांक 24 ऑक्टोबर रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचं निर्दशनास आलं होतं.

त्यामुळे मे.न्यास कम्युनिकेशन यांनी उमेदवारांनी दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्‍नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्‍नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचं कळवण्यात आलं होतं. त्यानुसार आता हे यादी प्राप्त झाली असून अशा उमेदवारांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे. शासनानं परिपत्रक काढून याबाबत निवेदन सादर केलं आहे.

महेशबाबूच्या मुलीने केला Selena Gomez सारखा डान्स; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकू

ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा होणार आहे. एकूण 589 उमेदवारांची होणार गट क ची परीक्षा पुन्हा होणार आहे. आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील यांनी याबद्दलची माहिती माहिती दिली आहे.

या तारखेला होणार परीक्षा

ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ला पुणे, लातूर, अकोला आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

First published: