मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गुजरातमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पुण्यात? लिस्ट समोर आल्याने खळबळ

गुजरातमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पुण्यात? लिस्ट समोर आल्याने खळबळ

गुजरातमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि गुन्हेगार सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागामध्ये राहत असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Shreyas

पुणे, 23 नोव्हेंबर : गुजरातमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि गुन्हेगार सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागामध्ये राहत असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. या यादीमध्ये 48 जणांची नावं आहेत, यात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या रियाझ भटकळ उर्फ मोहम्मद रियाझ, मोहसीन इस्माईल चौधरी, इक्बाल भटकळ या तिघांचाही समावेश आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांनी वॉन्टेड दहशतवादी आणि गुन्हेगारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे. गुजरात पोलीस या 48 आरोपींचा शोध घेत आहेत, यामध्ये देशातले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहेत.

देशातील बॉम्बस्फोटाच्या कटातील कथीत मुख्य सूत्रधार असणारा इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक भटकळसह इतर दहशतवाद्यांचा या यादीत समावेश आहे, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

हे मोस्ट वॉन्टेड पुण्यात?

रियाझ भटकळ उर्फ मोहम्मद रियाझ

इक्बाल भटकळ

मोहसीन इस्माईल चौधरी

हैदरअली आलमदार हुसैन

तालिब इरानी

जामीर हसन शेख

राखी अका हेमा राजू

अका विरासिंग गौड

देवगन सुनिल जैन

युवराज धनाजी माने

नीरज मूलचंद निशाद

First published:

Tags: Gujarat, Pune