मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आजीचा खून करून केले 9 तुकडे, नातू आणि बापाने कटरने कापले हातपाय, पुण्यातील घटना

आजीचा खून करून केले 9 तुकडे, नातू आणि बापाने कटरने कापले हातपाय, पुण्यातील घटना


एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य या 20 वर्षाच्या तरूणाने केलं आहे आणि दुर्दैव म्हणजे सख्ख्या मुलाने त्याला साथ दिली आहे

एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य या 20 वर्षाच्या तरूणाने केलं आहे आणि दुर्दैव म्हणजे सख्ख्या मुलाने त्याला साथ दिली आहे

एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य या 20 वर्षाच्या तरूणाने केलं आहे आणि दुर्दैव म्हणजे सख्ख्या मुलाने त्याला साथ दिली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 07 सप्टेंबर : घर सोडून जाण्यास सांगितले आणि दागिन्यांचा ताबा न दिल्याच्या रागातून 20 वर्षांच्या नातवाने वडिलांच्या मदतीने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (pune) मुंढवा परिसरात उघडकीस आला आहे. नातवाने अक्षरशः आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उघड झाले. मुंढवा पोलिसांनी कसून चौकशी करीत हा गुन्हा उघडकीस आणत नातवाला आणि त्याच्या वडिलांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा गायकवाड (वय ६२, रा. म्हसोबानगर, मुंढवा) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर साहिल ऊर्फ गुड्डु संदीप गायकवाड (वय २० रा. म्हसोबानगर, मुंढवा) आणि संदीप गायकवाड (वय ४२, रा. गुरुकृपा सोसायटी, लक्ष्मी इन्क्लेव्ह, केशवनगर, मुंढवा) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. साहिल याने आजीचा  गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह कासेवाडी झोपडपट्टी भवानीपेठ इथं नेला.

आजीच्या जुन्या घरी कुणी राहत नसल्याने तिथे इलेक्ट्रीक कटर आणून त्याच्या साह्याने मृतदेहाचे तब्बल 9 तुकडे केले आणि गोणीत भरून खराडीच्या बाजून जाऊन नदीत टाकून दिले. मुसळधार पाऊस असल्याने ही घटना कुणाच्या लक्षात आली नाही मात्र तपासपथकातील पोलीस संतोष जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर तपास केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

(रिक्षाचालक बनला चोर! 5000 कारची चोरी, हत्या, 3 बायका अन्.., 27 वर्षांची क्राईम फाईल वाचून व्हाल शॉक)

मृतदेहाचा केवळ पाय नदीतून बाजूला पडलेला सुमारे २० किमी दूर लोणी काळभोर पोलिसांना मिळून आला. त्याची डीएनए चाचणी केल्यावर तो पाय उषा गायकवाड यांच्या मृतदेहाचा असल्याचं  स्पष्ट झालं आणि पोलिसांनी खुनाचं कलम वाढवले आहे.  याप्रकरणी शीतल मनोज कांबळे (वय ४०, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली.

(VIDEO : डाय करूनही केस पांढरे राहिल्यानं संताप, महिलेची सलून चालकाला मारहाण)

एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल असं भयानक कृत्य या 20 वर्षाच्या तरूणाने केलं आहे आणि दुर्दैव म्हणजे सख्ख्या मुलाने त्याला साथ दिली आहे. पोलिसांनी नातू आणि वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: