Home /News /maharashtra /

पुण्यात भरलंय 'हातामागावरील वस्त्रांचं' मोठं प्रदर्शन; खरेदीसाठी होतेय स्त्रियांची गर्दीच गर्दी : VIDEO

पुण्यात भरलंय 'हातामागावरील वस्त्रांचं' मोठं प्रदर्शन; खरेदीसाठी होतेय स्त्रियांची गर्दीच गर्दी : VIDEO

title=

हातमागावरील वस्त्रांचे भव्य प्रदर्शन पुण्यामध्ये भरले आहे. यामध्ये विविध पद्धतीच्या साड्या, ब्लाउज, कुर्ती यांचा या वस्त्रांमध्ये समावेश आहे. अनेक ठिकाणांहून लोकांना या प्रदर्शानास भेट देत आहेत.

  पुणे, 28, जून : आझादी का अमृतमहोत्सव (azadi ka amrit mahotsav) अंतर्गत विणकर कामगारांना, हात व्यासायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुण्यात पहिल्यांदाच भव्य हातमाग प्रदर्शनाचे (Handloom exhibition in pune) आयोजन केले आहे. सिद्धी बँक्वेट, डीपी रस्ता, म्हात्रे पुलाजवळ पुणे येथे हे प्रदर्शन भरले आहे. येत्या 3 जुलै पर्यंत नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहील अशी माहिती, प्रदर्शनाच्या आयोजिका अनघा घैसास यांनी दिली आहे. भारतीय वस्त्रांची ओळख म्हणून हातामगावरील वस्त्रांची महती सर्व जगभर आहे. अशाच हातमागावरील वस्त्रांचे भव्य प्रदर्शन पुण्यामध्ये भरले आहे. महाराष्ट्रासह 14 राज्यांतील 60 पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे. यामध्ये देशभरातील विविध विनकारांनी आपल्या प्रांतातील खासियत असलेल्या विविध सिल्कच्या हातमागावरील वस्त्र विक्रीसाठी पुणेकरांसाठी उपलब्ध केले आहेत. या प्रदर्शनामध्ये आपल्याला कोलकत्ता, बिहार, पटना, कर्नाटक, बेंगलोर, कश्मीर आदी राज्यांतील विविध प्रांतातील उत्कृष्ट हातमागावरील वस्त्रं महोत्सवात पहायला मिळेल. वाचा : उद्धव ठाकरेंनी एकदा नाही दोनवेळा केला फडणवीसांना फोन, पुन्हा युती की खुर्ची वाचवणार? पत्ता आणि भेटीची वेळ सकाळी 9 ते रात्री उशिरापर्यंत हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धी बँक्वेट, डीपी रस्ता, म्हात्रे पुलाजवळ पुणे येथे हे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शना बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण 098508 35778 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

  गुगल मॅपवरून साभार...

  ओरिजनल सिल्कची मिळणार वस्त्र  सर्व वस्त्रे ही ओरिजनल सिल्कची असून यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची भेसळ दिसणार नाही. इथे जेवढे काही स्टॉलधारक आहेत त्यांचा मुख्य व्यवसाय हातमागावरील वस्त्रे विणणे हा आहे. यामुळे ही वस्त्रे आपल्याला रास्त दरामध्ये उपलब्ध होत आहेत. येथे 2 हजार पासून ते 80 हजारापर्यंत आपल्याला वस्त्रे मिळतील. वाचा : '2-3 दिवसात भाजपचं सरकार येणार; यंदाची आषाढी एकादशी पूजा फडणवीसच करणार', भाजप खासदाराचा दावा कोणती वस्त्र मिळतील  यामध्ये विविध पद्धतीच्या साड्या, ब्लाउज, कुर्ती यांचा या वस्त्रांमध्ये समावेश आहे. या सोबतच ड्रेस मटेरियल देखील आपल्याला येथे मिळेल. यासोबतच भारतातील विविध प्रांतातील कारागीर इथे असल्यामुळे ज्यांना ज्यांना विविध प्रांतातून वस्त्रे होलसेलमध्ये मागवायचे असेल त्यांच्यासाठी इथे भरपूर प्रमाणात वस्त्रे मिळू शकतात.
  First published:

  Tags: Maharashtra News, Pune

  पुढील बातम्या