पुणे, 06 डिसेंबर : पुण्यातील (pune) भारती विद्यापीठ पोलीस (bharti univercity) ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी तब्बल 6 गोळ्या झाडल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर मनूर शेख (Samir sheikh murder) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आज सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. प्रचंड वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर चंद्रभागा चौकात मारेकऱ्यांनी तब्बल 6 गोळ्या घालून त्यांचा खून केला. संबंधित हत्या आर्थिक कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुण्यात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/H7eEtxY2hR
— News18Lokmat (@News18lokmat) December 6, 2021
बांधकाम व्यावसायिक समीर मनूर शेख याने आरोपी मेहबूब बलुर्गी या आपल्या मित्राकडून 5 लाख रुपये उसने घेतले होते. मृत समीर याने यातील अडीच लाख रुपये मेहबूबला परत दिले. पण उरलेले पैसे देण्यासाठी मात्र समीर टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे, मृत समीर अंगावर भरपूर सोनं घालून परिसरात 'गोल्डन मॅन' बनून फिरतो. पण आपले अडीच लाख रुपये देत नाही.
यामुळे मेहबूबचा समीरवर राग होता. यातूनच संतापलेल्या मेहबूब याने दोन महिन्यांपूर्वी समीरची गळ्यातील सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला. यातूनच मेहबूब याने समीरचा पाठलाग करून त्याला भयंकर मृत्यू दिला आहे. आरोपीनं समीरला पाठीमागून पकडून जवळून 6 गोळ्या घालल्या आहेत. भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहबूबला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.