मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यपाल नियुक्त आमदार आणि 1 मंत्रिपद आम्हाला द्या', रामदास आठवलेंची शिंदे सरकारकडे मागणी

राज्यपाल नियुक्त आमदार आणि 1 मंत्रिपद आम्हाला द्या', रामदास आठवलेंची शिंदे सरकारकडे मागणी

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाही'

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाही'

आमच्या आरपीआय पक्षाने सगळ्या पक्षांना ताकत दिली आहे आणि आताही देत आहे. माझी पार्टी मोठी नाही. पण आम्ही...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 06 सप्टेंबर :  'राज्यात सध्या महायुतीच सरकार आले आहे. या सरकारमध्ये आम्हाला संधी मिळावी 1 मंत्रिपद मिळावं आणि 12 राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी' अशी मागणीच रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कुटुंबासह पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाची आरती केली. यावेळी ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट शिंदे आणि भाजप सरकारकडे नव्याने मागणी केली आहे.

'जसा पत्रकार संघाला प्रत्येक वर्षाला अध्यक्ष मिळतो. तसा निर्णय आम्ही पुण्यात पक्षासाठी घेतला आणि दरवर्षी आम्ही देखील निवडणुका घेणार आहोत. आमच्या आरपीआय पक्षाने  सगळ्या पक्षांना ताकत दिली आहे आणि आताही देत आहे. माझी पार्टी मोठी नाही. पण आम्ही दुसऱ्या पक्षाला भक्कम बनवत आलो आहे. अगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत होतो त्यांना ताकद दिली आता भाजपसोबत आहे आता भाजपला ताकद दिली आहे, असं आठवले म्हणाले.

(शिवसेना Vs शिंदे गटाची लढाई निर्णयाक टप्प्यावर, सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी)

आता राज्यात शिवसेना आणि भाजपचे महायुतीचे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्हाला संधी मिळावी 1 मंत्रिपद मिळावं आणि 12 राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली आहे, असंही आठवलेंनी सांगितलं.

(शिंदे गटाकडून विदर्भातील जिल्हा प्रमुखांची घोषणा; मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात होणार मोठा राजकीय धमाका?)

'मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच आहोत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर करणार आहोत. आम्ही १५० जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न करणार असून आम्ही तिघे एकत्र लढू असंही आठवले म्हणाले.

First published: