मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार; वर्षभरापासून सुरू होता भयंकर प्रकार

Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार; वर्षभरापासून सुरू होता भयंकर प्रकार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape in Pune: पुण्यातील एका तरुणीला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार (give numb medicine and raped) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे, 26 नोव्हेंबर: मागील काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका तरुणानं कंपनीत सोबत काम करण्याऱ्या युवतीला स्वयंपाक करण्यासाठी घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना महिलावरील अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील (pune) एका तरुणीला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार (give numb medicine and raped) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीनं पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. सचिन बलदेव शर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा पंजाब राज्यातील पटीयाला येथील रहिवासी आहे. आरोपीनं 24 जानेवारी 2020 ते  1 जानेवारी 2021 दरम्यान पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं 24 नोव्हेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-मोठा भाऊ घरी नसताना दिराने वहिनीचा गळा चिरला; पोलीस ठाण्यात झाला दाखल

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची एका मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाली होती. आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिला विविध ठिकाणी घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेला गुंगी येणारं औषध देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला आहे. पीडित तरुणी बेशुद्धावस्थेत असतानाच, आरोपीनं तिला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

हेही वाचा-भयंकर! बापच करायचा लैंगिक शोषण, मित्रांच्या मदतीने केला खून

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या हा धक्कादायक प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीनं अखेर पोलिसांत धाव घेतली आहे. पीडितेनं पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune, Rape