मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बस अडवून भर रस्त्यावर चालक आणि दुचाकीस्वार तरुणामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पुण्यातला LIVE VIDEO

बस अडवून भर रस्त्यावर चालक आणि दुचाकीस्वार तरुणामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पुण्यातला LIVE VIDEO


भर रस्त्यावर दुचाकीस्वार  तरुण आणि चालकामध्ये मारामारी सुरू झाली. लाथ आणि बुक्याने दोघे एकमेकांना मारहाण करत होते.

भर रस्त्यावर दुचाकीस्वार तरुण आणि चालकामध्ये मारामारी सुरू झाली. लाथ आणि बुक्याने दोघे एकमेकांना मारहाण करत होते.

भर रस्त्यावर दुचाकीस्वार तरुण आणि चालकामध्ये मारामारी सुरू झाली. लाथ आणि बुक्याने दोघे एकमेकांना मारहाण करत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 14 नोव्हेंबर : पुण्यात वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहे. अशातच एका पीएमपीएल बसचालक आणि दुचाकीस्वार दोन तरुणांमध्ये भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन चौकामध्ये ही घटना घडली आहे. स्वारगेट डेपोची बस क्रमांक सीएनजी 799 डी आर 2550 ही पुणे स्टेशन चौकात आली होती. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने बससमोर गाडी आडवी लावली आणि जोरदार वाद घातला. बघता बघता बाचाबाची हाणामारीमध्ये रुपांतरीत झाली.

भर रस्त्यावर दुचाकीस्वार  तरुण आणि चालकामध्ये मारामारी सुरू झाली. लाथ आणि बुक्याने दोघे एकमेकांना मारहाण करत होते. त्याचवेळी या तरुणाचा मित्र सुद्धा मारण्यासाठी धावून आला. हे पाहून बसचालकाचा सहकारी वाहक खाली उतरला आणि या तरुणाला चांगलाच चोप दिला.

(VIDEO - त्या क्षणी RPF जवान तिथं नसता तर तिचं काय झालं असतं; 'ते' भयंकर दृश्य CCTV मध्ये कैद)

या मारहाणीचा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणी घटनेची नोंद बंडगार्डन पोलीस चौकीत करण्यात आली आहे. दोन्ही तरुणांना अटक केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मुंबईतील लोकलमध्ये जागेवरून हाणामारी

दरम्यान, रोज कामाला जाण्यासाठी नागरिक अगदी धावतपळत लोकल ट्रेन पकडतात. मात्र, ट्रेनमधील गर्दीत स्वतःसाठी जागा मिळवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. यावरुन अनेकदा प्रवाशांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळतं.

(नागपूर : खेळता-खेळताच जीव गमावला; क्षणभराचा आनंद 5 वर्षीय रियांशच्या जीवावर बेतला)

मात्र, कधीकधी हा वाद इतका टोकाला जातो, की गर्दीतही हे प्रवासी एकमेकांची धुलाई करू लागतात.

नालासोपारा स्थानकात चौथ्या सीटवर बसण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सकाळी हा प्रकार घडला. पुढे हा वाद इतका वाढला की तिथेच दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. या हाणामारीचा व्हिडिओही आता व्हायरल झाला आहे.

First published: