मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : भुकेलेल्या गरिबांसाठी पुण्याचे तरुण धावले, सुरू केला स्तुत्य उपक्रम; घरपोच देतायत अन्न, पहा VIDEO

Pune : भुकेलेल्या गरिबांसाठी पुण्याचे तरुण धावले, सुरू केला स्तुत्य उपक्रम; घरपोच देतायत अन्न, पहा VIDEO

पुण्यामधील काही सुशिक्षित तरुणांनी मिळून 'आर्ट ऑफ हेल्पिंग फाउंडेशन'च्या (Art of Helping Foundation) मार्फत गरीब वृद्ध नागरिकांची सेवा म्हणून त्यांना रोजचे दोन वेळचे जेवण बनवून त्यांना घरपोच डब्बे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 'दैनंदिन लंगर' या उपक्रमाद्वारे परिसरातील 13 वृद्धांना डब्बे पुरवले जात आहेत.

पुढे वाचा ...

पुणे, 11 जुलै : पुण्यामधील काही सुशिक्षित तरुणांनी मिळून 'आर्ट ऑफ हेल्पिंग फाउंडेशन'च्या (Art of Helping Foundation) मार्फत गरीब वृद्ध नागरिकांची सेवा म्हणून त्यांना रोजचे दोन वेळचे जेवण बनवून त्यांना घरपोच डब्बे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 'दैनंदिन लंगर' या उपक्रमाद्वारे गरीब वृद्ध नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचे डब्बे घरपोच मोफत (free of cost) दिल्या जात आहेत. 'दैनंदिन लंगर' या उपक्रमाद्वारे परिसरातील 13 वृद्धांना डब्बे पुरवले जात आहेत. 

शहरात असे अनेक गरीब लोक राहतात, ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असते. अनेकदा गरीब वृद्ध नागरिकांना उपाशीपोटी झोपावे लागते. तर काही जण पाणी पिऊन दिवस काढतात. अशा गरीब वृद्ध नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी शहरातील 'आर्ट ऑफ हेल्पिंग फाउंडेशन'च्या वतीने 'दैनंदिन लंगर' या उपक्रमाद्वारे गरीब वृद्ध नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचे डब्बे घरपोच मोफत दिल्या जात आहेत. 

वाचा : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट येणार एकत्र? दीपक केसरकरांचं मोठं विधान

या उपक्रमांबाबत संस्थेचे संस्थापक असलेले दिपांकर पाटील हे सांगतात की, "मी स्वतः ग्राफिक डिझायनर असून माझ्यासोबतच आणखीन काही तरुण-तरुणी या उपक्रमात सहभागी आहेत. हे सर्वजण आपले रोजची कामधंदे सांभाळून वृद्ध लोकांच्या सेवेसाठी मदत करतात. यामध्ये मुख्यत्वे आम्ही जेवण बनवण्यापासून ते डब्बे घरपोच पोहोचण्यापर्यंत सर्व कामे करतो. आमचा 'दैनंदिन लंगर' या उपक्रमाद्वारे आम्ही गरीब वयस्कर नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचे डब्बे घरपोच मोफत देतो." 

सहकारी वैष्णवी भुतडा या सांगतात की, "आर्ट ऑफ हेल्पिंग फाउंडेशन गेल्या अडीच ते तीन वर्षापासून कार्यरत आहे. यापूर्वी देखील आम्ही गरिबांना धान्याचे किट तसेच लॉकडाऊनमध्ये देखील आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. तसेच काही सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अन्नछत्र देखील चालवतो."

वाचा : आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, राष्ट्रीय बाल आयोगाच्या आदेशाने मुंबईत खळबळ

13 वृद्धांना पुरवले जातात डब्बे 

सध्या आम्ही आमच्या परिसरातील 13 वृद्धांना डब्बे पुरवत आहोत. तसेच अजून 70 वृद्ध वेटिंग लिस्ट वरती आहेत. आमच्या संस्थेला आर्थिक आणि वस्तूंद्वारे आपण मदत करू शकता. यामुळे आम्हाला जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. असहाय्य, बेबंद, एकटे, अपंग, वृद्ध नागरिक आणि अंधांसाठी मोफत टिफिन सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात या उपक्रमाचा लाभ घेऊ शकणारे कोणी तुम्हाला माहीत असल्यास कृपया आम्हाला कळवा, असे दिपांकर पाटील म्हणतात.

जेवणामध्ये काय दिल्या जाते 

यामध्ये फळे असतात. त्यासोबत एक वेळची वरण, भात, भाकरी, भाजी आणि एक वेळची चपाती, भाजी, वरण, भात असा जेवणाचा डब्बा असतो. ज्या वृद्ध नागरिकांना डॉक्टरांनी साखर आणि भात किंवा चपाती खाण्यासाठी मज्जाव केला आहे. अशा रुग्णांसाठी वेगळ्या पद्धतीचा डब्बा दिला जातो. अशा प्रकारे त्या वृद्धांना आवश्यक अशा सर्व जेवणाचा पुरवठा आम्ही आमच्या संस्थेद्वारे करतो. यामुळे या उपक्रमात जेवढा वृद्धांना मी डब्बे देतो त्या सर्वांच्या चेहऱ्यावरचे समाधान अवर्णनीय असते, असे दिपांकर पाटील सांगतात.

मदत कशी कराल? 

जर तुम्हाला देखील मदत करायची असेल तर तुम्ही  या  क्रमांकावर 9700800859 संपर्क करू शकता.   Website: https://artofhelpingfoundation.org/ वेबसाईटवर तुम्ही जाऊन मदत करू शकता. तसेच त्रिमूर्ती चौक, लक्ष्मी गार्डन, आंबेगाव बीके, पुणे, महाराष्ट्र 4111046 पत्त्यावर भेट देऊ शकता.

First published:

Tags: Pune, Pune news, Senior citizen