Home /News /maharashtra /

बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी कारवाई, ज्येष्ठ माजी खासदाराला दाखवला घरचा रस्ता! आता भाजपच्या वाटेवर?

बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी कारवाई, ज्येष्ठ माजी खासदाराला दाखवला घरचा रस्ता! आता भाजपच्या वाटेवर?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Ahalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

    पुणे 03 जुलै : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. यानंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बंडखोरी करणाऱ्या अनेकांवर शिवसेनेनं कारवाईही केली. आता शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Ahalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाऐवजी केली होती 'ही' मागणी, या नेत्याचे सुचवले होते नाव, संजय राऊतांचा दावा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं कॅप्शन लिहिलं होतं. यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. अमोल कोल्हे यांच्या विरोधीत लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते शिवसेनेत नाराज होते. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांचा मोठा वाद होता, याबाबत त्यांनी सेनेकडे तक्रारही केली होती. अशात आता आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आहेत 'काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड', संजय राऊतांची जळजळीत टीका शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या