Home /News /maharashtra /

BREAKING : अखेर ठरलं, राज ठाकरेंची पुण्यातील सभा २२ तारखेला होणार!

BREAKING : अखेर ठरलं, राज ठाकरेंची पुण्यातील सभा २२ तारखेला होणार!

 राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे,

राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे,

राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे,

पुणे, 19 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची पुण्यात सभा (Pune Rally) होणार की नाही याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण, राज ठाकरेंची सभा पुण्यात होणारच असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यात येत्या २२ तारखेला ही सभा होणार अशी माहिती मनसेनं दिली आहे. (Raj Thackeray Pune Rally updates) मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. ही सभा रद्द करावी लागणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता सभेसाठी दोन जागेची चाचपणी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते हेमंत संभुस यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर शमला आहे. पुणे मनसेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर दरम्यान, मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं. शिवाजीनगरचे मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क झटापटीत झालं असल्याचं समोर आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात आयोजित बैठकीत निमंत्रण न दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांत वाद झाला. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चक्क झटापटही झाली. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असुन कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब शैलेश विटकर यांनी बैठकीत विचारला. यानंतर संतापलेले रणजित शिरोळे हे अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यांसमोर हा वाद झाला. अयोध्या दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हा वाद झाला. या प्रकारामुळे मनसेची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या