Home /News /maharashtra /

Pune : अडीच लाखांचा केक कधी खाल्लाय का? पुण्यात तयार होणाऱ्या या महागड्या केकचा, पहा VIDEO

Pune : अडीच लाखांचा केक कधी खाल्लाय का? पुण्यात तयार होणाऱ्या या महागड्या केकचा, पहा VIDEO

राॅयल

राॅयल आयसिंग केक

आपण आतापर्यंत 150-200 रुपयांपर्यंतचे केक पाहिले असतील. पण, पुण्यात तब्बल अडीच लाखांचा राॅयल आयसिंग (Royal Icing Cakes) नावाचा केक बनतो. ते बनविण्यासाठी 8 तास लागतात, तर हा केक 8 दिवस टिकतो.

  पुणे, 15 जून : लहानांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे केक! वाढदिवस असो की, ॲनिव्हर्सरी सगळीकडे दिमाखदारपणे केक कापल्याशिवाय सेलिब्रेशन होऊच शकत नाही. अशा या केकची एक मोठी इंडस्ट्री आहे. यामध्ये रॉयल आयसिंग (Royal Icing Cake) हा केकमधील एक महत्वाचा भाग आहे. हा केस बनविण्यामध्ये प्राची देब यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. खुद्द त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेऊ रॉयल आयसिंग केकबद्दल! (Expensive Royal Icing Cakes are made in Pune) 2015 मध्ये लंडनमध्ये प्राची यांनी सर एडिसन यांच्याकडे रॉयल आयसिंग केक शिकल्या. सर एडिसन यांनी ब्रिटिश रॉयल फॅमिलीसाठी खूप वर्ष बेकिंग केले आहे. प्राची भारतात आल्यावर आपल्या भारतीय लोकांच्या मानसिकतेचा विचार करून रॉयल आयसिंगचे शाकाहारी व्हर्जन बनवले. यामध्ये त्यांनी नवीन क्लृप्ती लढवून भारतीयांसाठी खास एगलेस केक तयार करतात.
  राॅयल आयसिंक केक
  ...असा आहे रॉयल आयसिंगचा इतिहास राणी व्हिक्टोरियाच्या लग्नाच्या वाढदिवसाला 200 वर्षांपूर्वी ही आयसिंग सादर केली गेली होती. म्हणून याला 'रॉयल आयसिंग', असे म्हटले जाते. ब्रिटिश रॉयल फॅमिलीसाठी या आयसिंगचा वापर केला जातो. त्यामुळे याची किंमतही खूप जास्त असते. या केकची रेंज खूप मोठी आहे आणि हा केक शिकणेदेखील तितकंच अवघड काम आहे. यामध्ये एकाग्रता आणि बेकिंगची आवड गरजेची असते. हा केक नॉर्मल केकपेक्षा जास्त वेळखाऊ आहे. 2 तास ते 6 तास हा केक बनवण्यासाठी लागतात. त्यामुळे केकची ऑर्डर 2 दिवस आधी घ्यावी लागते. या केकमध्ये एक किलोचा केक 5 हजारांपासून सुरू होतो. आतापर्यंत प्राची यांनी दीड लाखांपर्यंतचे केक इतके महागडा केक त्यांनी तयार केले आहेत. वाचा : Pune: पुण्याच्या या हटके मिसळीचा VIRAL VIDEO पाहिला असेल, आता पाहा त्यामागची गोष्ट प्राची यांना केकने मिळवून दिला सन्मान! केक क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा बर्मिंघम येथे 2019 मध्ये झालेल्या 'केक मास्टर्स अवॉर्ड'मध्ये रॉयल-आयसिंग श्रेणीच्या विजेत्यादेखील प्राची होत्या. त्या सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिके, माध्यमांमध्ये अनेक उद्योगांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसेच 2 वर्ल्ड रेकॉर्ड देखील प्राची यांच्या नावावर आहेत. रॉयल आयसिंग केक हा एक केकचा वेगळा प्रकार आहे.
  राॅयल आयसिंक केक
  किती रुपयांना असतो हा केक? या राॅयल केकला उच्चभ्रू सोसायटीमध्ये खासकरून मागणी असते. कारण, हा केक महाग असतो. केकची किंमत 5 हजार रुपये किलोपासून अडीच लाखांपर्यंत या राॅयल केकच्या किमती आहेत. या केकची ऑर्डर 2 दिवसआधी द्यावी लागते. पुण्यातुन हा केक भारतभर कोठेही फ्लाईट आणि रेल्वे ए.सी. द्वारे घेऊन जाऊ शकतो. वैशिष्ट्य म्हणजे हा केक 8 दिवस ताजा राहतो. वाचा : बीडच्या ‘या’ हाॅटेलमध्ये 60 वर्षांपासून चक्क चहाच्या बशीत दिली जाते पुरीभाजी; पहा या चटकदार पदार्थाचा VIDEO या राॅयल आयसिंग केकची कशी द्याल ऑर्डर? राॅयल आयसिंग केकची ऑर्डर देण्यासाठी www.prachidhabaldeb.com वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर तुम्ही केकची ऑर्डर देऊ शकाल. सोशल मीडियावरही www.instagram.com/prachidhabaldeb ग्राहक प्राची यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा 8605536538 या मोबाईल नंबरवर ग्राहक थेट संपर्क करू शकतात.
  First published:

  पुढील बातम्या