पुणे, 1 डिसेंबर : "वीज (Electricity) फुकटात कधीपासून मिळायला लागली? कोळसा (Coal), पाणी (Water) यापासून वीज निर्मिती होते. त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीजबिल भरायला का नको वाटतं? मुंबई अंधारात बुडाली तेव्हाही आम्ही तत्काळ वीज पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवलीय. अडचण निर्माण केलीय. 56 हजार कोटींचा बोजा आलाय, तो भरायचा कसा? वीजबिल भरावंच लागणार आहे, फक्त यामध्ये मी माझ्या परीने सवलत देण्याचा प्रयत्न करतोय. वीजबिल हप्तेवार पद्धतीने भरता येऊ शकतं जे आम्ही केलेलं आहे", अशी भूमिका ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मांडली आहे.
"केंद्र सरकारचे दिल्लीतील नेते कशी टीका करतात हेच समजत नाही. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत. क्रूड ऑईलचे दर कमी असतानाही त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाहीत. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. इंधनाचे दर कमी करण्याबाबत केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचा आहे. ते राज्य सरकरवर का ढकलतात? भाजपशासित राज्यांना जीएसटीचा परतावा देतात? महाराष्ट्राला का देत नाही. महाराष्ट्रकडे बोट दाखवण्याचा काम का करतात?", असे सवाल नितीन राऊत यांनी केले.
हेही वाचा : 'आता UPA आहे का?' काँग्रेसच्या प्रश्नावर ममता बॅनर्जींचा सवाल
राज्यात आसमानी संकटामुळे शेतकरी हवादिल झाले आहेत. तर दुसरीकडे वीजबिलासाठी महावितरणाकडून कृषींपपांचे वीज कनेक्शन कापलं जात आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी बीडमधील एका शेतकऱ्याने महावितरणाकडून वीज कापली गेल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे अहमदनगरमध्ये भाजप नेते बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरणाच्या कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या; हल्लेखोरांनी गळा चिरून पळवलं मुंडकं
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील कृषीपंपाच्या वीज कापणी विरोधात आक्रमक झाले होते. "महावितरण कंपनीने सक्तीची वीज बील वसुली चालू केल्यामुळे शेतकऱ्यांवर रब्बी हंगामात संकट आले आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांवरील हा अन्याय तात्काळ थांबवावून त्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत जोडून द्यावेत अन्यथा शेतकरी पायतान घेऊन अधिकाऱ्यांना झोडपून काढतील", असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.