मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणेकरांना दिलासा! मागील 24 तासांत 4 धरणात जमा झाला इतका पाणीसाठा...

पुणेकरांना दिलासा! मागील 24 तासांत 4 धरणात जमा झाला इतका पाणीसाठा...

गेल्या आठवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे मुठा नदीच्या प्रवाहातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतील पाणीसाठा 2.5 टीएमसीवर गेला होता.

गेल्या आठवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे मुठा नदीच्या प्रवाहातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतील पाणीसाठा 2.5 टीएमसीवर गेला होता.

गेल्या आठवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे मुठा नदीच्या प्रवाहातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतील पाणीसाठा 2.5 टीएमसीवर गेला होता.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 8 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या (Pune dam) पाणी पातळीतही वाढ झाली आहे. (Rain in Pune) पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या पाणीपातळीत जवळपास 1 टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत ते 5.45 टीएमसी इतके झाले आहे. गेल्या महिनाभरापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तूट झाली होती. पाऊस आता थोडासा कमी झाला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. गेल्या आठवड्यात पावसाच्या कमतरतेमुळे मुठा नदीच्या प्रवाहातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतील पाणीसाठा 2.5 टीएमसीवर गेला होता. यानंतर राज्याच्या जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) सतर्क केले आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार, पीएमसीने 4 जुलैपासून शहरातील पाणीपुरवठा एका दिवसाआड केला होता. आता सणासुदीच्या दिवसांचा हवाला देत 11 जुलैपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत केला आहे. मात्र, नंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. पुण्यातील या धरणांमध्ये गुरुवारी सकाळी 4.51 टीएमसी पाणीसाठा होता, तो शुक्रवारी सकाळी 5.45 टीएमसी झाला. गेल्या 24 तासांत वरसगाव पाणलोट क्षेत्रात 55 मिमी, पानशेतमध्ये 60 मिमी, टेमघरमध्ये 81 मिमी आणि खडकवासलामध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्याजवळच्या धरणांची उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता पुढीलप्रमाणे आहे -
  • खडकवासला- 1.97 TMC (थाउजंड मिलियन क्यूबिक फूट)
  • पानशेत - 10.65 TMC
  • वरसगांव- 12.82 TMC
  • टेमघर- 10 TMC + 1.5 TMC
हेही वाचा - Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका टळणार पाणी पातळीत घट, पाऊस थांबला पुण्यातील तुरुणीसोबत दुर्दैवी घटना - पुण्यात मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली.  मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेली आहे. ही घटना मावळ-कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात घडली. साक्षी सतीश वंजारे, असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी परिसरातून ती मैत्रिणी सोबत फिरायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना पाय घसरून ही तरुणी पडली आणि इंद्रायणी नदी पात्रात वाहून गेली.
First published:

Tags: IMD FORECAST, Pune rain, Rain updates

पुढील बातम्या