Home /News /maharashtra /

Pune : 'माधव नाम वेणू' बासरीमध्ये आहे श्रीकृष्णाचा नामाचा आकार; कशी तयार केली बासरी? डाॅ. पं. केशव गिंडेंकडूनच ऐका : VIDEO

Pune : 'माधव नाम वेणू' बासरीमध्ये आहे श्रीकृष्णाचा नामाचा आकार; कशी तयार केली बासरी? डाॅ. पं. केशव गिंडेंकडूनच ऐका : VIDEO

माधव नाम वेणू

'माधव नाम वेणू' बासरी

साधारणपणे आपण छोट्या आकाराचा बासरी (Flute) पाहिलेल्या आहेत. पण, याच बासरीमध्ये सखोल संशोधन करून वेगवेगळे आकार देण्याचा प्रयोग डाॅ. पं. केशव गिंडे यांनी केलेला आहे.

    पुणे, 29 जून : आपणच आतापर्यंत जास्त लांबीच्या बासरी (flute) पाहिल्या असतील. त्यामध्ये विविध प्रकारदेखील पाहिले असतील. मात्र, पुण्यातील डॉक्टर पंडित केशव गिंडे यांनी तयार केलेली बासरी ही सर्वांत वेगळी आहे. कारण, ही बासरी भगवान श्रीकृष्णाच्या कपाळावरील नामाच्या आकाराच्या आहे. यामुळे या बासरीचे नाव 'माधव नाम वेणू' असे आहे. बासरीमध्ये नवनवीन प्रयोग करत असलेल्या डॉ. पं. केशव गिंडे यांनी आणखी एका संशोधनाद्वारे इंग्रजी 'यु' आकाराची बासरी विकसित केली आहे. त्यामुळे आता चार सप्तकाची बासरीही सहजतेने वाजविता येणार आहे. (Dr. Pt. Keshav Ginde made Madhav Nam Venu flute)  वाचा : महाविकास आघाडीत ‘ऑल इज वेल’ नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक अमूल्यज्योती या संस्थेमार्फत बासरी तसेच संगीत या विषयी प्रचार, प्रसार, प्रबोधन, संशोधन आणि सादरीकरण अशा पंचसूत्रीवर 33 वर्षांपासून कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून या संस्थेचे संस्थापक डॉ. पं. केशव गिंडे यांनी या आधीच सुमारे 4 सप्तके एकाच बासरीवर वाजविण्याची क्षमता असलेली 'केशव वेणू ' निर्माण करून विश्वविक्रम नोंदवला आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये काही राग हे खर्जातील स्वरांचा आविष्कार केल्यास राग सौंदर्य व्यवस्थित मांडता येते. काही राग हे उत्तरांग प्रधान असतात, ज्यामध्ये तार सप्तक, अति तार सप्तकात अधिक खुलतात. असे शुद्ध तसेच संपूर्ण राग स्वरूप दाखविण्यासाठी ही केशव वेणू संशोधिली आहे. वाचा : मविआ सरकारला दिलासा, सुप्रीम कोर्टाने केली मागणी मान्य, आज 5 वाजता सुनावणी डॉ. गिंडे अभियंता असून नाविन्याचा ध्यास असलेली व्यक्ती आहे. त्यांच्या या स्वनिर्मित केशव वेणूवर संशोधन करण्याची गरज भासू लागली. या वेणूच्या लांबीची लांब सडक हात व लांब बोटे असलेली फार थोडी माणसे आहेत. 4 फूट लांब असलेली केशव वेणू हातात धरणे व वाजविणे अवघड होते. अशी सहज साध्य, हाताच्या व बोटांच्या आवाक्यात यावी अशी ही वेणू निर्माण करता येईल का यावर संशोधन सुरू झाले. डॉ. गिंडे यांच्या पीएचडीच्या प्रबंधानुसार बासरीची लांबी हाताच्या आवाक्यात आणण्यासाठी बासरीच्या बांबूला इंग्रजी यु आकारात वळविल्यास ही बासरी वाजविणे अतिशय सोपे, सोयीस्कर होऊ शकेल असे म्हटले होते. यावर कार्यवाही सुरू झाली. या वेणूवर तसेच अनेक बांबूवर प्रयोग करून शेवटी यु आकाराच्या वेणूची निर्माण केली गेली. या वेणूची लांबी अर्ध्यावर आली. वाचा : Shiv sena MLA in Goa : काय हाटील.., रस्त्यावर अडवले तर समुद्राच्या मार्गेही पळू शकता आमदार! आता प्राथमिक शाळेतील एखादा प्रतिभावंत कलावंतही ही चार स्वर सप्तके वादन क्षमता असलेली बासरी अतिशय सहजतेने, वाजवू शकेल. यामुळे ही वेणू जगातील कोणताही बासरीवादक, ही लांब पल्ल्याची म्हणजे सुमारे 48 स्वर म्हणजे 88 श्रुती एकाच बासरीवर आपल्या 10 बोटांनी अतिशय सहज वाजवू शकेल. खर्ज सप्तकातील षड्जसाठी एक छोटी कळ लावली आहे. बासरीवादकाने ही कळ छातीला टेकविली की हा घुमारेदार, सौष्ठव प्राप्त षड्ज अतिशय सुरेल वाजेल. विलंबित, मध्य, द्रुतगती, टप्पा ठुमरी, भजन,नाट्यगीत, सिने संगीत, तंत अंग, धृपद, धमार, ठुमरी, टप्पा, ई. अतिशय सुबकपणे मांडता येते. वाचा : राज्यपालांचे आदेश राफेलपेक्षा जास्त वेगाने, त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल; संजय राऊतांचा टोला संशोधनाची उपयुक्तता खर्ज षड्ज ते मध्य सप्तक पंचम किंवा पंचम पासून षड्ज, असे मिन्ड, जमजमा, सुंथ, घसिट, आंदोलने, ही सर्व संगीताची अंगे त्यांच्या अंगभूत सौंदर्याने मोठ्या सहजतेने, आत्मविश्वासाने वाजविता येतील. या वेणूचे 'केशव नाम वेणू' असे सार्थ नामकरण करण्यात आले. ही वेणू म्हणजे केशव वेणूचा नवा अवतार आहे. बासरीमधील केशव वेणू प्रमाणेच माधव वेणू ही खर्ज सप्तकाची बासरी म्हणजे केशव वेणूच्या खर्ज सप्तक पंचमाशी जुळणारी व त्याखालील खरज अति खर्ज सप्तक वाजणारी आधीच संशोधिली होती, त्यावरही संशोधन करून इंग्रजी यु आकार देऊन सर्वांना सहज साध्य होईल अशाप्रकरे तयार केली आहे. या दोनही वेणूचा आराखडा कागदावर लिहून अगदी तंतोतंत अशी बासरी निर्माण करण्याची तांत्रिक बाजू नादवेणू फ्ल्युट्स चे संस्थापक डॉ. राजू साळवे या कल्पक, बुद्धिमान शिष्य व बासरी निर्माता यांनी चोख सांभाळली आहे
    First published:

    Tags: Maharashtra News, Pune

    पुढील बातम्या