बारामती, 26 ऑक्टोबर : भाऊबीज निमित्त पवार कुटुंबिय बारामतीच्या काटेवाडीमधल्या त्यांच्या घरी एकत्र आलं होतं, यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह आठ बहिणींनी अजित पवारांचं औक्षण केलं. आठ बहिणींनी अजितदादांची एकत्र औक्षण केलं, पण त्यांनी फक्त सुप्रिया सुळे यांनाच ओवाळणी दिली.
तुमच्या सगळ्यांची ओवाळणी सुप्रिया सुळे यांच्याकडे देत असल्याचं अजित पवार त्यांच्या बहिणीला म्हणाले. अजित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
राज्याच्या राजकारणात कायमच व्यग्र असणारं पवार कुटुंब दिवाळीच्या निमित्ताने आवर्जुन बारामतीमध्ये एकत्र येतं, यावेळीही पवार कुटुंबाने उत्साहामध्ये दिवाळीचा सण साजरा केला.
दिवाळीचा पाडवा ! आई आणि बाबा... pic.twitter.com/KiL0Hy5wH4
— Supriya Sule (@supriya_sule) October 26, 2022
भाऊबीजेशिवाय आज पाडवाही आला आहे, त्यामुळे पवार कुटुंबाने पाडव्याचंही सेलिब्रेशन केलं. सुप्रिया सुळे यांनीही पाडव्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये शरद पवार यांच्या पत्नी त्यांचं औक्षण करताना दिसत आहेत.
सुप्रिया सुळे यांनी पाडव्यानिमित्त त्यांचे पती सदानंद सुळे यांचंही औक्षण केलं, याचा व्हिडिओदेखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाडव्याचा हा सण आज बारामतीत औक्षण करून साजरा केला. pic.twitter.com/X7jkF4C8Sh
— Supriya Sule (@supriya_sule) October 26, 2022
दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाच्या सगळ्या पिढ्या एकत्र येऊन सण उत्साहात साजरा करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Diwali, Sharad Pawar, Supriya sule