मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आपसे ये उमीद ना थी' सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना सणसणीत टोला

'आपसे ये उमीद ना थी' सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना सणसणीत टोला

 दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठराखण केली. यापुढे भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव...'

दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठराखण केली. यापुढे भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव...'

दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठराखण केली. यापुढे भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव...'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  sachin Salve

पुणे, 21 नोव्हेंबर : 'देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उमीद ना थी. दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठराखण केली. यापुढे भाजपला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही' अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानावर फडणवीस यांनी सारवासारव करत पाठराखल केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

" isDesktop="true" id="789151" >

माझी भूमिका ही पक्षाची भूमिका राज्यपाल याच्यावर टीका करण आपली संस्कृती नाही. पण ते बोलतात  छत्रपती अपमान करण्याच पाप हे सर्व करतात.राज्यपाल यांनी सुद्धा हेच केलं आहे. हे कुठे तरी थांबलं पाहिजे. राज्यपाल हे परत परत चूक करत आहेत, याचा अर्थ ते जाणूनबुजून करत आहे. ही चूक नसून चॉईस झाली आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

'फडणवीस आपसे ये उमीद ना थी. दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठराखण केली. यापुढे भाजप छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा पलटवारही सुळे यांनी फडणवीसांवर केला.

(शिवाजी महाराजांबद्दलचं ते वक्तव्य भाजपची अधिकृत भूमिका? चंद्रशेखर बावनकुळेंचं गोलमाल उत्तर)

'माझं भाषण नीट ऐका, एकूण 35 मिनिटांचं भाषण होतं. माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावं. थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटलं. मी सविधानावर विश्वास ठेवणारी आहे. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते आमचे विरोधक आहे. ते आमचं कौतुक करणार नाही. त्यांनी फार टीका केली, त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहे. आज टेक्नॉलाजी वाढली आहे. पण त्याचा गैर वापर होत आहे. जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला.

'मी कुणाला काहीही बोलले नाही. मी एक मत मांडलं आहे. प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, असंही मी त्या भाषणात सांगितलं होतं, असंही सुळेंनी सांगितलं.

'इतिहास हा खरा मांडला पाहिजे सिनेमा वेगळा अन् खरं वेगळं असतं. इतिहास आणि काल्पनिक वेगळं,ट्विट बाबत याचा इतिहास असेल म्हणून त्यानी असं ट्विट केलं

मला त्यांचं ट्विट नीट पाहयला हवं ते पाहुन मी बोलेल. पण सावरकर यांच्या दोन बाजू आहेत. सावरकरांबद्दल दोन टोकाच्या भूमिका आहेत, असंही सुळे म्हणाल्या.

(इतिहासामुळे वादात सापडलेल्या भगतसिंग कोश्यारींचा इतिहास, अशी झाली राजकारणात एण्ट्री!)

नवले पुलावर सर्व्हिस रोड झाला नाही. क्रोनिक पॉईंट झाले, उतार आहे या रस्त्यावर काम करणे महत्वाचे आहे. आज पुणे महापालिका आयुक्त यांची भेट घेणार आहे. सगळी माहिती ही गडकरींना देणार आहोत, तात्काळ यावर उपाय योजना केली पाहिजे. आता अपघात कमी झाले आहेत ते आता शून्यावर आणायचे आहेत. स्पीड मोठा प्रॉब्लेम आहे अपघातात. सर्विस रोड, चांगले फुटपाथ करणं गरजेचं आहे. पुणे पालिकेनं हे केलं पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली.

First published: