मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तोपर्यंत छत्रपतीच आमचे आदर्श', राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल!

'...तोपर्यंत छत्रपतीच आमचे आदर्श', राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वादात सापडले आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Shreyas

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

20 नोव्हेंबर, पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भगतसिंग कोश्यारी यांनी विधान केलं आणि त्याचे पडसाद उमटले. विरोधकांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर शिंदे गटाकडूनही भगतसिंग कोश्यारींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

'जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच असतील. आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराजच असतील, त्यामुळे यावर वाद व्हायचं कारण नाही, असं मला वाटतं. राज्यपाल्यांच्या मनातही हे स्पष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आदर्श कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कोणताही दुसरा अर्थ काढला जाऊ नये, असं मला वाटतं,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते राज्यपाल?

'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली.

अजित पवारांचा निशाणा

'राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे', अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तर सुप्रिया सुळे यांनीही या वादावरून इशारा दिला आहे.

'राज्यपालांबद्दल प्रोटोकॉलनुसार बोलता येत नाही, पण...', सुप्रिया सुळेंचा अल्टिमेटम!

First published:

Tags: Devendra Fadnavis, Governor bhagat singh