मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Cabinet Expansion : संजय राठोडांना मंत्रिपद? फडणवीसांनी दाखवलं मुख्यमंत्र्यांकडे बोट!

Cabinet Expansion : संजय राठोडांना मंत्रिपद? फडणवीसांनी दाखवलं मुख्यमंत्र्यांकडे बोट!

 विस्तार झाला नाहीतर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे

विस्तार झाला नाहीतर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे

विस्तार झाला नाहीतर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे

पुणे, 09 ऑगस्ट : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय राठोडांना मंत्रिपद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. शिंदे गटाकडून संजय राठोड यांनीही शपथ घेतली. राठोड यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, आता यावर बोलायचं काम नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसंच, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते, विस्तार झाला नाहीतर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे,काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही' असंही फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. (शिंंदे गटाचं 'मिशन सुरत-गुवाहाटी' फत्ते करणारे रवींद्र चव्हाणांना बक्षीस!) 'महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती, त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही' असा टोलाही फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांना लगावला. 'ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील आशा पक्षाने आशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा राष्ट्रवादीला प्रश्न आहे. पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहवा आणि नंतर त्यांनी आशा प्रकारचं ट्विट करावं, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. (Rakshabandhan : भावाला राशीनुसार अशा रंगाची बांधा राखी; त्याच्यावरची टळतील संकटे) दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजय राठोड यांना मंत्री केल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या