मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...तर शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन निरर्थकच, शिवसेनेनं दिलं अमित शहांना निवेदन

...तर शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन निरर्थकच, शिवसेनेनं दिलं अमित शहांना निवेदन

 पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून अमित शहा यांना एक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून अमित शहा यांना एक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून अमित शहा यांना एक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुणे, 19 डिसेंबर : कर्नाटकमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबन (desecration of Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Bengaluru)   करण्यात आल्यामुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात आहे, यावेळी शिवसेनेनं पुतळ्याचं विटंबन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे.

पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून अमित शहा यांना एक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

'आज आपण पुणे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजनासाठी आला आहात. आपल्या हस्ते आज भूमिपूजन झाले आणि कर्नाटकमध्ये आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री घडलेल्या निंदनिय घटनेला क्षुल्लक घटना म्हणून सांगत आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. त्यांना जेलमध्ये डांबले जात आहेत किती हा विरोधाभास? असा सवाल या निवदेनातून सेनेनं उपस्थितीत केला आहे.

Alert! सामान्य वाटणारी समस्याच ओमिक्रॉनचं लक्षण; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

आपल्याच पक्षाच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं विधान करणे हे निदंनीय आहे आणि दुसरीकडे आपल्या हस्ते आज पुण्यात शिवाजी महाराजांच्या पूतळ्याचे भूमिपूजन होत आहेत, त्यामुळे भूमिपूजन निरर्थकच ठरवत आहे, आपण देशाचे गृहमंत्री आहात तातडीने या प्रकरणी कारवाई करावी आणि कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी सेनेनं केली आहे.

लहान मुलांना फोन देताय खेळायला? मोबाइलच्या स्फोटात दोन लहानगे होरपळले

दरम्यान, गणेश कला क्रीडा रंगमंच इथं भाजप बूथ कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी अमित शहांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे ' 2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. पण शिवसेना पलटली. मी खोटं बोललो म्हणतात ठीक आहे, ते मान्य आहे. पण, तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला, हिंदुत्व सोडलं' अशा शब्दांत

'ही तीन चाकी रिक्षा बंद पडली आहे. चाकात हवा नाही. या सरकार च्या हातात राज्य कसं चालेल? हे निक्कमी सरकार आहे. शिवसेना म्हणते,' सत्ता मेरा जन्मसिद्ध अधिकार किसी भी तरह लेकर रहेंगे' तुम्हाला आव्हान आहे, निवडणुकीला सामोर जा, तिघांविरोधात लढा. मग बघा तरी काय अवस्था होते, असं थेट आव्हानच अमित शहांनी सेनेला दिलं.

First published: