मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING: पुण्यातील बड्या बिल्डरला अजित पवारांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, मागितली 20 लाखांची खंडणी

BREAKING: पुण्यातील बड्या बिल्डरला अजित पवारांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, मागितली 20 लाखांची खंडणी

NRHM च्या कंत्राटी भरती प्रक्रियेतील उमेदवार आरोग्य सेवकांना कॉल करून पैश्यांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला

NRHM च्या कंत्राटी भरती प्रक्रियेतील उमेदवार आरोग्य सेवकांना कॉल करून पैश्यांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला

Crime in Pune: पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे, 14 जानेवारी: पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून धमकी (Fake threat call) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करत 20 लाखांची खंडणी (Demand 20 lakh ransom) मागितली आहे. मागील जवळपास दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपींच्या त्रासाला कंटाळून संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक (6 accused arrested) केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात  IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गूगल प्ले स्टोअरवरून 'फेक कॉल अ‍ॅप' नावाचं अ‍ॅप डाऊनलोड केलं होतं. संबंधित अ‍ॅपचा वापर करत आरोपींनी अजित पवारांचा मोबाइल क्रमांक वापरला होता. तसेच आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असं सांगून 20 लाखांची खंडणी मागितली होती.

हेही वाचा-बारामतीत मोठ्या दुग्ध उत्पादक कंपनीकडून तब्बल दीड कोटींची वीजचोरी

गेल्या दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत हा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोपींनी संबंधित व्यावसायिकाकडे वीस लाखाची खंडणी मागून त्यांच्याकडून आतापर्यंत दोन लाख रुपये उकळले आहेत. आरोपींनी फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाला फोन करून हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले आणि इतर नऊ जणांसोबत सुरू असलेला जमिनीचा वाद मिटवून टाका. अन्यथा गावात पाऊल ठेऊ देणार नाही. तसेच परिसरात तुमचा कोणताही प्रकल्प चालू देणार नाही, अशी धमकी आरोपींनी फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाला दिली होती.

हेही वाचा-पुण्यात अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल,Suicide Note मधून धक्कादायक माहिती उघड

या प्रकरणी अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Crime news, Pune