Home /News /maharashtra /

दत्तात्रय भरणे यांना मातृशोक, भरणे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार भरणेवाडीत

दत्तात्रय भरणे यांना मातृशोक, भरणे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार भरणेवाडीत

महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचे शुक्रवारी रोजी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.

पुणे, 2 जुलै : महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचे शुक्रवारी रोजी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज भरणेवाडी येथे दाखल होत भरणे कुटुंबाचे सांत्वन केले. गिरीजाबाई उर्फ विठोबा भरणे यांच्या निधनाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह भरणे कुटंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देशाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी निवासस्थानी भेट देऊन संपूर्ण भरणे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे आणि दत्तात्रय भरणे ही चारही भावंडं व भरणे परिवार उपस्थित होता. (सुसाट वेगाने धावली बस; 50 बंडखोर आमदारांसाठी मुंबई विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंत विशेष कॉरिडोर) गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्यावर मागील काही दिवसांपासून अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता भरणेवाडी येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. यावेळी फलटणचे आमदार दिपक चव्हाण उपस्थित होते.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: NCP, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या