पुणे, 21 मे : जिजामातांचं स्मारक असलेल्या पुण्यातील (Pune News) लाल महालात लावणीचं शूटिंग झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी लावणी सादर करणारी नृत्यांगणा आणि तिच्या साथीदारांविरोधात तक्रारही दाखल केली आहे. अखेर या प्रकरणात स्वत: नृत्यांगणा हिने एक व्हिडीओ शेअर करीत आपलं मत व्यक्त केलं आहे.
वैष्णवी पाटील नावाच्या तरुणीने याबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने लावणीचं शूटिंग केल्याबद्दल क्षमा मागितली आहे. आपण केलेलं कृत्य चुकीचं असून याबाबत तिने जाहीर माफी मागितली आहे.
— Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र (@esantoshshinde) May 17, 2022
संभाजी ब्रिगेडकडून तीव्र प्रतिक्रिया
लाल महाल पुणे महानगर पालिकेने बंद ठेवला. मात्र तिथे चित्रपटातील गाण्यांवर, तमाशातील गाण्यांवर डान्स करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. इतकी वाईट अवस्था लाल महालाची झाली आहे.
महाराष्ट्राच्या स्मृतीस्थळावर असं बिभत्स पद्धतीने गाणं वाजवलं जातं, डान्स केला जातो. मला पुण्याच्या पोलिस आयुक्तांना विनंती करायचीय, तुम्ही जातीने लक्ष घालून फरासखाना पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.