Home /News /maharashtra /

pune water crisis : पुणेकरांनो पाणी जपून वापरा दीड महिनाच पुरणार पाणी?

pune water crisis : पुणेकरांनो पाणी जपून वापरा दीड महिनाच पुरणार पाणी?

पावसाने ओढ दिल्याने मुंबई (Mumbai) पाठोपाठ आता पुणेकरांवरही पाणी कपातीचं (Crisis of water cut on Pune residents) संकट गोंगावत आहे.

  पुणे, 30 जून : पावसाने ओढ दिल्याने मुंबई (Mumbai) पाठोपाठ आता पुणेकरांवरही पाणी कपातीचं (Crisis of water cut on Pune residents) संकट गोंगावत आहे. याचे मुख्यकारण पुणे शहराला (pune city water management) पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरणात (khadakvasla dam) अवघा 8.91 टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाऊस (monsoon rain) नाहीच पडला तर पुणेकरांना अवघा सव्वा ते दीड महिना पुरेल एवढंच पाणी या धरणात शिल्लक आहे. पुण्यातल्या धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली (pune water crisis) आहे. त्यामुळे, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. 

  मुंबईतही करण्यात आलीये पाणीकपात -

  मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस प़डला आहे. त्यामुळे सध्यच्या परिस्थितीत तलावांमध्ये अत्ंयत कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही 10 टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे.

  हे ही वाचा : 'जय महाराष्ट्र' म्हटल्यामुळे रंगली राजीनाम्याची चर्चा, अखेर संजय राऊत म्हणाले...

  जून महिन्यातील पाऊस मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 70 टक्के कमी आहे, असे महापालिकेने सांगितलं आहे. यामुळे पुण्यातही धरण साखळीत पाण्याची पातळी घसरली बरीच घसरली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. यासोबतच पाणीकपातीचा सामनाही करावा लागण्याची शक्यता आहे. पाणीकपात झाल्यास पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल.

  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट?

  खडकवासला साखळी धरणात अवघा 8.91 टक्के जलसाठा

  पुणेकरांना अवघा सव्वा ते दिड महिनाच पाणी पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक

  हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांना घेऊन केलं बंड, फडणवीस सरकारमध्ये फक्त 13 जणांना मिळणार संधी?

  पुणेकरांना रोज 1620 mld पाणी लागते

  धरणात अवघं 2.60 tmc पाणी शिल्लक

  पुणेकरांना मिळू शकते दिवसाआड पाणी?

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pune, Pune (City/Town/Village), Water crisis

  पुढील बातम्या