मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Coronavirus: नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता; महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावणार? अजित पवार म्हणाले...

Coronavirus: नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता; महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावणार? अजित पवार म्हणाले...

File Photo

File Photo

Coronavirus omicron variant : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी पुन्हा निर्बंध लावण्यात येत आहेत.

पुणे, 27 नोव्हेंबर : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये, मॉल्स, थिएटर्स सुरू करण्यात आले आहेत. 1 डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, आता त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. करोनाचा उद्रेक वाढत असताना अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे (Coronavirus new variant Omicron) राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात येणार का? (Will restriction impose in Maharashtra) असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar reaction on restrictions may impose in Maharashtra after Coronavirus Omicron variant alarm)

राज्यात पुन्हा निर्बंध?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात विविध प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, पुण्यात परिस्थिती बरी आहे पण जागतिक पातळीवर नव्या प्रकारचा व्हायरसचा फैलाव होत आहे. त्याबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मत आहेत. मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतील. काही निर्बंध पुन्हा आणावी लागतील असं त्या क्षेत्रातल्या मान्यवरांचे मत आहे.

वाचा : Omicron वर लस प्रभावी आहे का?, फायझरनं दिली महत्त्वाची माहिती

नव्या व्हेरीएंटमुळे मुंबईचीही चिंता वाढली

आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांमध्ये करोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी करोना टास्क फोर्सकडे केली आहे. सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये करोनाचे नवा व्हेरिएंट आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे.

मुंबई मनपाची महत्त्वाची बैठक

नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील उपाययोजना, नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक होणार आहे. नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर दिला जाणार आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्त ही बैठक घेतील. या बैठकील सर्व कोविड हॉस्पिटलचेडिन,टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नव्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन नाव

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization, WHO) शुक्रवारी घातक कोरोना व्हायरसच्या B.1.1529 या नवीन स्ट्रेनला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' (Variant of concern) म्हणून संबोधलं आणि त्याला ओमिक्रॉन (Omicron) असे नाव दिलं. या श्रेणीतील व्हायरस अत्यंत संसर्गजन्य मानले जातात.

डेल्टा व्हेरिएंट देखील त्याच श्रेणीत ठेवण्यात आला होता. हा व्हेरिएंट आढळण्यापूर्वीच युरोपातल्या अनेक देशांमध्ये आणि ब्रिटन, जर्मनी आणि रशियासह इतर प्रदेशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत होती. रशियामध्ये या महामारीमुळे रेकॉर्ड ब्रेक लोकांचा मृत्यू झाला होता. आता हा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगात घबराट पसरली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Coronavirus, Pune