Home /News /maharashtra /

'खरं बोलायला घाबरत नाही, महाविकास आघाडीत सत्तेत असल्यासारखी वागणूक मिळत नाही', यशोमती ठाकुरांचं मोठं विधान

'खरं बोलायला घाबरत नाही, महाविकास आघाडीत सत्तेत असल्यासारखी वागणूक मिळत नाही', यशोमती ठाकुरांचं मोठं विधान

महाविकास आघाडीकडून विधान परिषदेत जिंकून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना पुण्यात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे.

पुणे, 18 जून : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना पुण्यातून (Pune) एक वेगळी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) विधान परिषदेत जिंकून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना पुण्यात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत असून आम्हाला पुण्यात सत्तेत असल्यासारखी वागणूक दिली जात नाही, असं धक्कादायक विधान यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. तसेच खरं बोलायला आपण कुणालाही घाबरत नाही, असंदेखील ठाकूर म्हणाल्या आहेत. यशोमती यांच्या या विधानाने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीत सारं काही आलबेल असल्याचा दावा तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून केला जातो. पण दर महिन्यात किंवा आठवड्यात महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या बातम्या वारंवार समोर येतात. त्यामुळे विरोधकांकडून हे सरकार अंतर्गत मतभेदातून कोसळेल, असा दावा केला जातो. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं सांगितलं जातं. आता पुन्हा तसंच काहीसं घडू शकतं. कारण यशोमती ठाकूर यांनी तसं विधान केलं आहे. त्या चाकण येथील महिला मेळाव्यात बोलत होत्या. (चित्रा वाघ यांना मोठा झटका, मेहबूब शेख प्रकरणातील तरुणीचा घुमजाव) राज्यात महाविकास आघाडी झाली. मात्र पुणे जिल्ह्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्तेत असून सत्तेत असल्यासारखी वागणूक दिली जात नाही. महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांचे हे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेला होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या