मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : पुणे विद्यापीठानं दिलंय स्वच्छ टेक्नॉलजी चॅलेंज, सहभागी होण्यासाठी ‘ही’ आहे अट

Pune : पुणे विद्यापीठानं दिलंय स्वच्छ टेक्नॉलजी चॅलेंज, सहभागी होण्यासाठी ‘ही’ आहे अट

पुण्यामध्ये 'टेक्नॉलॉजी चॅलेंज' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये 'टेक्नॉलॉजी चॅलेंज' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये 'टेक्नॉलॉजी चॅलेंज' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 24 नोव्हेंबर : केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची घोषणा करण्यात आली असून ' वेस्ट टू वेल्थ ' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग नोंदविण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ' टेक्नॉलॉजी चॅलेंज' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठीची नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 30 नोव्हेंबर पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. या स्पर्धेत नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक समूह, नवे लघुउद्योजक, तांत्रिक व अतांत्रिक कॉर्पोरेट यात सहभागी होऊ शकतात.

Video : सुंदर गावाला सरकार देणार लाखोंच बक्षीस, तुमच्या गावालाही आहे मोठी संधी!

सहभागी होण्यासाठी यामध्ये माहिती भरा 

सामाजिक समावेशकता, शून्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पारदर्शकता या चार मुख्य विषयावर स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/Yn3eBH3wgzQnydtm8 यामध्ये माहिती तुम्ही भरू शकता.

असे असेल पारितोषिक

या स्पर्धेत सर्वोत्तम तांत्रिक कल्पना सादर करणाऱ्या पहिल्या तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

Pune : पुणे शहरात रक्ताचा तुटवडा! पाहा का आली इतकी गंभीर वेळ, Video

सर्वांनीच या संधीचा लाभ घ्यावा 

या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिक तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढत नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळत आहे. स्टार्टअप देखील यात सहभागी होऊ शकत आहेत. त्यामुळे सर्वांनीच या संधीचा लाभ घेत देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, असं आवाहन संचालक नवोपक्रम डॉ.संजय ढोले यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 

https://www.pmc.gov.in/en/swachh-technology-challenge-2023

First published:

Tags: Local18, Pune