मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : इंदापूरमध्ये राडा! हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे समर्थक आमनेसामने, नेमकं काय घडलं?

VIDEO : इंदापूरमध्ये राडा! हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे समर्थक आमनेसामने, नेमकं काय घडलं?

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची 99 वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची 99 वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची 99 वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

पुणे, 18 सप्टेंबर : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची 99 वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे समर्थक आमनेसामने आले. सभेचा पहिला टप्पा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. मात्र आमदार दत्तात्रय भरणे या ठिकाणावरून जाताच सभेच्या दुसऱ्या सत्रांमध्ये आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील समर्थक शिक्षकांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळालाय. 2010 साली इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी 38 गाळे आणि सांस्कृतिक भवन बांधण्यात आलं. या कामी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सहकार्य लाभल्याने तत्कालीन संचालक मंडळांनी बांधण्यात आलेल्या 38 गाळ्यांच्या व्यापारी संकुलाला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे हर्षवर्धनजी पाटील व्यापारी संकुल असे नामांतर दिले. (पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती) मागील चार महिन्यापूर्वी या शिक्षक पतसंस्थेची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटाची सत्ता आली. मागील संचालक मंडळाने दिलेले नाव बदलून त्या ऐवजी राजर्षी शाहू फुले आंबेडकर व्यापारी संकुल असे नव्याने नामांतरण करण्यात आले त्यावरून वादाला सुरुवात झाली. हर्षवर्धन पाटील गटाचे शिक्षक हे काळ्या फिती लावून सभेस आले होते. वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होताच पूर्वीचे संचालक मंडळ व आताचे विरोधी गटाचे सभासदांनी सभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी गटाकडे माईकची मागणी केली होती.सत्ताधारी गटाने माईक देण्यास विलंब केला आणि त्यावरूच हा वाद वाढत गेला. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने भिडले एकमेकांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. अशा घोषणाबाजी गोंधळमय वातावरणात सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर केले.
First published:

पुढील बातम्या