मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

loan app ने लोन घेऊ नका! 4778 पुणेकरांचे अश्लील फोटो करून लाखो रुपयांना लुटले, मोठी टोळी गजाआड

loan app ने लोन घेऊ नका! 4778 पुणेकरांचे अश्लील फोटो करून लाखो रुपयांना लुटले, मोठी टोळी गजाआड

  कोरोना काळामध्ये अनेक जणांचे रोजगार बुडाले. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. हे अॅप कोणत्याही कागदपत्राची जास्त पूर्तता न करता कर्ज देत होती

कोरोना काळामध्ये अनेक जणांचे रोजगार बुडाले. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. हे अॅप कोणत्याही कागदपत्राची जास्त पूर्तता न करता कर्ज देत होती

कोरोना काळामध्ये अनेक जणांचे रोजगार बुडाले. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. हे अॅप कोणत्याही कागदपत्राची जास्त पूर्तता न करता कर्ज देत होती

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  sachin Salve

अमित राय, प्रतिनिधी

पुणे, 01 ऑक्टोबर : अॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने अवघ्या 2 हजार रुपयांचे कर्ज देऊन लाखो रुपये अनेकांकडून उकळले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात 18 जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या टोळीने आतापर्यंत

4778 लोकांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 18 जणांना अटक केली आहे. ही टोळी अॅपच्या माध्यमातून कर्ज देत होती आणि फोटोमध्ये छेडछाड, मार्फ करून अश्लील फोटो तयार करत होती. त्यानंतर कर्जदाराला ब्लॅकमेल करत होती.

पुणे सायबर पोलिसांनी एका कॉल सेंटरवर छापा टाकून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून तब्बल 48 फोन जप्त केले आहे. कॅम्प्युटर आणि रोख 70 लाख रुपये जप्त केले आहे. या बोगस अॅप चालवणाऱ्या टोळीकडे जवळपास 1 लाख लोकांचे फोन नंबर सापडले आहे.

(महिलेने केनियाहून सँडलमध्ये लपवून आणले कोट्यावधींचे ड्रग्ज, मुंबई विमानतळावर येताच...)

ही टोळी लोन अॅप प्ले स्टोर आणि इतर वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना फसवत होती. एवढंच नाहीतर सोशल मीडिया साईटवर जाहिराती देत होते. कर्जबाजारी तरुण-तरुणी या जाहिरातींना भुलून कर्जासाठी अर्ज करत होती, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

(VIDEO: दिवसाढवळ्या घरात घुसून चोरायची लाखोंचे दागिने; मुंबईतील महिलेनं पोलिसांना आणलं नाकीनऊ, शेवटी..)

मागील दोन वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता. कोरोना काळामध्ये अनेक जणांचे रोजगार बुडाले. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. हे अॅप कोणत्याही कागदपत्राची जास्त पूर्तता न करता कर्ज देत होती. त्यामुळे ही लोक अशा अॅपवरून सहजपण कर्ज घेत होती. 500-7000 पर्यंत सहज कर्ज दिले जात होते, पण अॅप डाऊनलोड केल्यानंतर संपर्क यादी, लोकेशन, एसएमएस, स्टोरेज, माइक्रोफोन, गॅलरी आणि इतर बाबींची परवानगी द्यावी लागत होती, इथच कर्जदाराकडून चूक होत होती, अशी माहिती पुणे सायबर सेलच्या डीसीपी भाग्यश्री नवताके यांनी दिली.

कमी रक्कमेचे कर्ज घेतल्यामुळे लोक लगेच जमा करत होते. पण, या अॅपकडून कर्जदारांना अतिरिक्त रक्कम मागितली जात होती. जर कुणी पैसे देण्यास नकार दिला तर त्या कर्जदाराचा फोटो मार्फकरून अश्लील फोटो तयार केले जात होते आणि ते व्हॉट्सअॅपवर त्याला पाठवून इतर लोकांना पाठवण्याची धमकी देत होते, त्यामुळे अनेक जण बदनामी टाळण्यासाठी पैसे देऊन टाकत होते.

एका महिनेनं या अॅपकडून 9 हजारांचं कर्ज घेतलं होतं. या महिलेनं 3 हजार रुपये जमा केले. बाकीची रक्कम देण्यास नकार दिला असता, तेव्हा सुनेचा अश्लील फोटो तयार करून पाठवले. या प्रकारमुळे ही महिला हादरून गेली. तिने पुणे पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

(VIDEO: दिवसाढवळ्या घरात घुसून चोरायची लाखोंचे दागिने; मुंबईतील महिलेनं पोलिसांना आणलं नाकीनऊ, शेवटी..)

पुण्यातील एका 30 वर्षीय इंजिनियरला सुद्धा अशाच प्रकारे फसणवण्यात आले होते. जवळपास 2 वर्ष या तरुणाला त्रास देण्यात आला. या तरुणाने 1 लाख 78 हजार रुपये जमा केले होते. पण तरीही या तरुणाला धमकी देऊन पैसे लुटले जात होते. या टोळीने जवळपास 4778 लोकांना फसवलं असल्याचे समोर आले आहे. वेगवेगळ्या तक्रारीच्या आधारे 18 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 6 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Marathi news