Home /News /maharashtra /

Pune : महागाईत खिशाचा विचार करणारं पुण्यातलं ठिकाण! इथं नाश्ताच्या खर्चात मिळतात कपडे, VIDEO

Pune : महागाईत खिशाचा विचार करणारं पुण्यातलं ठिकाण! इथं नाश्ताच्या खर्चात मिळतात कपडे, VIDEO

title=

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचा (Fergusson College) रस्ता अर्थात एफसी रोड हा तरुणाईचा शॉपिंग डेस्टिनेशन ( Shopping Destination ) म्हणून ओळखला जातो.

  पुणे,06 ऑगस्ट : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचा (Fergusson College) रस्ता अर्थात एफसी रोड हा तरुणाईचा शॉपिंग डेस्टिनेशन ( Shopping Destination ) म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरती असंख्य छोटी मोठी दुकाने आहेत. या दुकानांमध्ये केसांच्या क्लिप पासून कपडे, टोपी, शूज, खाण्यापिण्याच्या असंख्य वस्तूंची रेलचेल आहे. एवढेच नाही तर अतिशय पॉकेट फ्रेंडली ( Pocket Friendly ) स्वस्तात या वस्तू येथे उपलब्ध होतात. चला तर मग या शॉपिंग डेस्टिनेशन बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया... पुण्यातील गुडलक कॅफे पासून ते फर्ग्युसन कॉलेजच्या शेवटच्या गेटापर्यंतचा हा रस्ता दिवसभर तरुणाने गजबजलेला असतो. या रस्त्यावरती पुण्यातील सर्वात स्वस्त मार्केट आहे. या मार्केटमध्ये अक्षरशः 20 ते 50 रुपयांपासून टॉप मिळतात एवढेच नाही तर त्याची क्वालिटी देखील तेवढीच चांगली असते. त्यामुळे या शॉपिंग डेस्टिनेशन मध्ये तरुणाईचा ओघ खरेदीसाठी जास्त असतो.

  हेही वाचा-   Aurangabad : डोंगरातून कोसळतोय दुधासारखा धबधबा, पावसाळ्यात चुकवू नका ही ट्रिप!

  या मार्केटमध्ये केसाचे हेअर बँड, क्लिप, ब्रेसलेट, कानातल्या रिंग्स, नोज रिंग विविध ज्वेलरीचे प्रकार, कपड्यांमध्ये वेस्टर्न आऊटफिट, इंडियन आऊटफिट, इंडो वेस्टन पद्धतीचे आऊटफिट्स विविध प्रकारचे चप्पल, सॅंडल प्रत्येक ऋतूनुसार विविध कपड्यांची नवनवीन फॅशन प्रत्येक आठवड्याला येथे बदलत असते. इथं विविध छोटी-मोठी हॉटेल्स असल्यामुळे खाण्यासाठी देखील इथं मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रूपाली, वैशाली, सुर्वेज, वाडेश्वर, एफसी चाट, फ्लेवर सँडविच, चैतन्याचा पराठा आदि हॉटेल देखील फेमस आहेत. केसाच्या क्लिप पासून ते पायातील शूज पर्यंतच्या सगळ्या मिळतात गोष्टी याबाबत शॉपिंग करणाऱ्या काजल भोसलेने या तरुणीने सांगितले की, मी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. अशा वेळेस कधी बोर झालं की आम्ही खरेदीसाठी येतो. अक्षरशः 500 रुपयांमध्ये मी केसाच्या क्लिप पासून ते पायातील शूज पर्यंतच्या सगळ्या गोष्टी घेऊ शकते. 50 रुपयांपासून टॉप मिळतो तर 150 रुपयाला चप्पल मिळते. एवढेच काय तर छोटी मोठी ज्वेलरी देखील 50, 60 रुपयांमध्ये मिळून जाते. यासोबतच शॉपिंग झाल्यावरती काहीतरी चटपटीत खायचे असेल तर 20 रुपयांच्या पाणीपुरी पासून ते ज्यूस देखील इथं एक नंबर मिळतो.

  हेही वाचा- Yog Yogeshwar Jay Shankar : घरबसल्या घ्या शंकर महाराजांच्या मठाचं दर्शन, VIDEO

  येथील विक्रेते समीर शेख सांगतात की, आमच्या संपूर्ण मार्केटमध्ये दिल्ली, लुधियाना, मुंबई, पंजाब तसेच बाहेर देशातून देखील मार्केटमध्ये विविध वस्तू विक्री उपलब्ध असतात. इथं तरूणाईची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे आणलेला माल लवकरात लवकर संपतो आणि यामुळे आम्हाला स्वस्तामध्ये वस्तू विकणे परवडते. अतिशय स्वस्त दरामध्ये इथं सर्व गोष्टी मिळतात. पुण्यातील सर्व महाविद्यालय या रोडच्या जवळपास असल्यामुळे येथे तरुणाईची गर्दी नेहमी असते. तसेच शनिवार रविवार नोकरदार वर्गाला देखील सुट्टी असल्यामुळे शनिवारी मोठ्या प्रमाणावर एफसी रोड गजबजलेला असतो.
  First published:

  Tags: Pune, Shopping

  पुढील बातम्या