मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...म्हणून कोल्हापूर सोडून आलोय, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं पुण्यात येण्याचं हे कारण

...म्हणून कोल्हापूर सोडून आलोय, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं पुण्यात येण्याचं हे कारण

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी कोल्हापूरमधून पुण्यात येण्यामागचे कारण स्वतःच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यातील (Pune) कोथरूडचे आमदार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी कोल्हापूरमधून पुण्यात येण्यामागचे कारण स्वतःच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यातील (Pune) कोथरूडचे आमदार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी कोल्हापूरमधून पुण्यात येण्यामागचे कारण स्वतःच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यातील (Pune) कोथरूडचे आमदार आहेत.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 30 जुलै : पुण्यातील हांडेवाडीमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील सर्व सत्ता स्थानक भाजपच्या ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली तसेच सोलापूरमधील काँग्रेस राष्ट्रवादीचे सत्ताकारण संपुष्टात आणलं त्याचप्रमाणे पुण्यात आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी कोल्हापूरमधून पुण्यात येण्यामागचे कारण स्वतःच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्यातील (Pune) कोथरूडचे आमदार आहेत. याआधी ते कोल्हापूरमध्ये पक्षासाठी काम करत होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते.

मात्र, 2019 साली चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवली. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून संधी देण्यात आली. त्यामुळे स्थानिक नेत्या मेधा कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र आता त्यांनी कोल्हापूरातून पुण्यात येणाच्या कारण स्पष्ट केले आहे.

हे वाचा - आधी सून, आता पोलीस हवालदाराचं टोकाचं पाऊल, पुण्यात नेमकं काय चाललंय?

चंद्रकांत पाटलांचे सांगितलं उत्तर -

पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आपल्याला पुण्यात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - आंघोळीला इतका वेळ कसा? पत्नीच्या सतर्कतेमुळे वाचला जीव, गिझरमुळे होत होता घात

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

"विधानसभेच्या निकालानंतर विश्वासघाताने सरकार गेलं आणि आपल्याला त्रास देणारं सरकार या महाराष्ट्रात आलं. पण, 2019 च्या निवडणुकीवेळी अनेक कार्यकर्त्यांना वाटलं की, कोल्हापूरमध्ये काम करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना अचानक पुण्यामध्ये का आणलं. अनेकांनी तर्कवितर्क लावले. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. ही मक्तेदारी आपण गेल्या काही वर्षांमध्ये संपवून टाकली आहे. याचा अनुभव असणारा आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थानाला सुरुंग लावण्यासाठी कार्यकर्ता पुण्याला शिफ्ट करण्याचा पक्षाने निर्णय घेतला," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

First published:

Tags: Chandrakant patil, Pune news