पुणे, 30 डिसेंबर : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात वाद झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यात सत्ता स्थापनेसाठी ऑफर दिल्याचं विधान शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं होतं. शरद पवारांनी केलेल्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत पवारांवर निशाणा साधला आहे. (Chandrakant Patil reaction on Sharad Pawar statement about PM Narendra Modi given offer)
पवारांचा राजकीय इतिहास खोटं बोलण्याचा
मोदींनी त्यावेळी राष्ट्रवादीला सरकार स्थापन्याची ऑफर दिली होती, असं शरद पवार कितीही सांगत असले तरी पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच राहिलाय, असा सणसणाटी आरोप चंद्रकांत पाटलांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना केलाय.
यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील म्हणाले, मोदीजी आणि पवारांचं नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्या इतपत मोठा नेता नाही. पण शरद पवारांचा बोलण्याचा इतिहास अगदीच खरा आहे असंही नाही, तुम्ही तपासून पाहा.
वाचा : Sindhudurg District Bank Election: भाजपला मोठा झटका
मोदींनी ऑफर दिली यावर कोण विश्वास ठेवणार?
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला ऑफर दिल्याची माहिती शरद पवारांनी दिली. पण पवारसाहेब आणि विश्वासार्हता? बंडाची भाषा ऐकून वसंतदादा पाटलांनी मंत्रालयातच पवारांना विचारले की बंड करणार का? त्यावर छे छे विश्वास ठेऊ नका असं सांगून पवार साहेबांनी दुसऱ्याच दिवशी बंड करून खंजीर खुपसतात (संदर्भ-प्रतापराव भोसले). त्यांनी वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात केला. आपले गुरू यशवंतराव चव्हाण यांनी पडत्या काळात सोडले. सोनिया गांधींना विदेशी मुळावरून विरोध केला आणि त्यांच्याच सरकारमध्ये जाऊन बसले. आम्हाला विरोधात बसायचा जनादेश आहे असे सांगत 2019 ला शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले. ज्यांची कृती आणि उक्ती वेगळी राहिली कायम त्यांचा मोदींनी ऑफर दिली यावर कोण विश्वास ठेवणार?
मा. पंतप्रधान @narendramodi यांनी राष्ट्रवादीला ऑफर दिल्याची माहिती मा.@PawarSpeaks यांनी दिली पण पवारसाहेब आणि विश्वासार्हता? ◾️बंडाची भाषा ऐकून तेव्हा वसंतदादा पाटीलांनी मंत्रालयातच पवारांना विचारले की बंड करणार का? त्यावर छे छे विश्वास ठेऊ नका अस सांगून 1/3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 30, 2021
बसले, ◾️आम्हाला विरोधात बसायचा जनादेश आहे असे सांगत 2019 ला शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले... ज्यांची कृती व उक्ती वेगळी राहिली कायम त्यांचा मोदीनी ॲाफर दिली यांवर कोण विश्वास ठेवणार? 3/3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 30, 2021
वाचा : दिवसभरात भाजपला दुसरा मोठा झटका
काय म्हणाले होते शरद पवार?
एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी म्हटलं होतं, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात एकत्र येत सत्ता स्थापन करण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. पण आमच्या दोन्ही पक्षांची विचारधारा ही वेगवेगळी असल्याने हे शक्य नसल्याचं मोदींना सांगितलं होतं.
नवाब मलिकांनी काय म्हटलं?
शरद पवारांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं, 2019 मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आग्रही होती. राष्ट्पवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आग्रही होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा आग्रह शरद पवारांकडे केला होता. शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काल शरद पवारांनी जी माहिती दिली होती ती पूर्णपणे खरी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, Narendra modi, Pune, शरद पवार