मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भामट्याकडून 4 महिला आमदारांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

भामट्याकडून 4 महिला आमदारांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे.

पुणे 19 जुलै : पुण्यातील एका तरुणाने राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मुकेश राठोड या तरुणाने 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केली आहे (Financial Fraud with 4 MLAs). त्याच्या विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी मुकेश राठोड हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शिवसेनेत बंडखोरांचा राडा सुरू असताना नाशकात शिवसैनिकावर प्राणघातक हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे. आई आजारी असल्याचं सांगत मुकेश राठोड नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे आर्थिक मदत मागितली होती. महिला आमदारांनीही मदत म्हणून काही रक्कम ऑनलाइन माध्यमातून या व्यक्तीला दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गणेश नाईकांना मुख्यमंत्र्यांना दे धक्का, शिंदे गटातील 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांना फोन केला आणि सांगितलं की त्याची आई बाणेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. तिच्या मेडिकलसाठी पैशांची गरज असल्याचं त्यांने सांगितलं. यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांना गुगल पे नंबर देत त्यावर ३,४००/- रु पाठविण्यास सांगितलं आणि त्यांची फसवणुक केली. याशिवाय इतर महिला आमदारांकडूनही अशीच रक्कम घेवून फसवणुक केल्याने राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Financial fraud, Mla