Home /News /maharashtra /

Pune : दहावी, बारावी अन् नापास विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअरची सूवर्णसंधी; कोर्स पूर्ण करताच लागणार 35000 चा जाॅब

Pune : दहावी, बारावी अन् नापास विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअरची सूवर्णसंधी; कोर्स पूर्ण करताच लागणार 35000 चा जाॅब

प्रिंटीग,

प्रिंटीग, पॅकेजिंग क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

दहावी, बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यामध्ये काही जणांना चांगलं यश आलं. पण काहींना मार्क्स कमी पडले किंवा काही जण नापास झाले असतील, त्यांच्यासाठी 'हा' क्षेत्रांत जाॅबच्या अनेक संधी आहेत.

    पुणे, 2 जुलै : मुद्रण ही एक जगभरामध्ये सध्या वेगाने विकसित होणारी इंडस्ट्री (Printing industry) आहे. यामध्ये असंख्य नोकरीच्या संधी देश-विदेशामध्ये उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनामध्ये सर्वच ठिकाणी प्रिंटिंगचा वापर आपल्याला दिसून येतो. जगभरामध्ये आणि आपल्या शेजारी काय चाललेय हे जरी माहित करुन घ्यायचे असल्यास प्रत्येकाला वर्तमानपत्राचाच आधार घ्यावा लागतो, अशा या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या भरपूर संधी आहे. तसेच चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा हमखास मिळते. तर या महत्त्वाच्या प्रिंटिंगसंबंधीच्या कोर्सविषयी जाणून घेऊया... (Career in Printing Technology in Pune) यासंदर्भात माहिती देताना पुणे विद्यार्थी गृह, संचालक, मुद्रण-प्रकाशन विभाग, पीव्हीजीचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर म्हणाले की, "कागदावर असेल, प्लॅस्टिकवर असेल अथवा मोठ्या खोक्यांपासून मिठाईच्या बॉक्सवर असेल सर्व ठिकाणी प्रिंटिंग येते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वापरात येणाऱ्या प्रत्येक वस्तुवर प्रिंटिंग असते. त्यामुळे प्रिंटिंगचा कोर्स पूर्ण केला की, पेपर इंडस्ट्रीमध्ये आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रिंटींगबरोबरच याही क्षेत्रात करीअर घडविता येते. मुद्रण म्हणजेच प्रिंटींग हा एक करिअरच्या दृष्टीने फारसा माहीत नसलेला अभ्यासक्रम आपण विचारात घेतल्यास नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत." वाचा : Nagpur : बारावी सायन्सनंतर ‘या’ क्षेत्रात करा करिअर; मिळेल लाखोंचा पगार, जाणून घ्या संपूर्ण माहिती कोणते विद्यार्थी हा कोर्स करू शकतात? 12 वी नंतर डिग्री आणि 10 वी नंतर डिप्लोमा, असा 3 वर्षांचा फूल टाईम प्रिंटिंग आणि पॅकेजिंग कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना 10 मध्ये मार्क्स कमी पडलेत किंवा नापास झालेत, त्यांच्यासाठीही सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून देण्यात आला असून तो 1 वर्षाचा आहे. डिप्लोमा कोर्सला सुरुवातीला 15 हजारांपासून पगार सुरू होतो, तर डिग्री कोर्सला महिना 35 हजार विद्यार्थ्यांना सुरुवातीला मिळतात. हा कोर्स पूर्ण करून साधारणपणे 10 टक्के विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशात संधी मिळते. कोर्सची फी किती आहे? 1 वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्स केल्याने अद्ययावत अशा मुद्रणातील तांत्रिक शिक्षणामुळे नोकरी अथवा छोटा व्यवसायदेखील सुरू करता येवू शकतो. 10 वी नंतरच्या डिप्लोमाला शासनाच्या (DTE) च्या नियमानुसार शासनाच्या वतीने महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि बीड येथे असलेल्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये केंद्रिय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी आकारण्यात येणारी फीसुद्धा सर्वसामान्यांना परवडणारी असते. डिप्लोमाची फी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 9000 आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45000 इतकी आहे. वाचा : MPSC Tips: गेल्या परीक्षेतील चुकांमुळे खचून जाऊ नका; यंदा अशी करा तयारी; एका झटक्यात क्रॅक होईल परीक्षा कोर्ससंबंधीचे नियम, सूचना आणि वेळापत्रक  12 वी नंतर मुद्रण पदवीसाठी ते विद्यार्थी पात्र ठरू शकतात. त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संबंधी प्रवेशाचे नियम लागू होतात. ते सर्व नियम आणि प्रवेशाचे सर्व वेळापत्रक https://www.pvgmipt.ac.in/ शासनाच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. सर्व प्रवेशासंबंधीचे नोटिफिकेशन स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केले जाते. बीई प्रिंटीगच्या 4 वर्षांच्या कोर्सनंतरही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या दृष्टीने एम.ई. अभ्यासक्रमासही प्रवेश घेता येतो. तसेच परदेशामध्येही उच्च शिक्षणासाठी जाता येते. विद्यार्थ्यांना कोणत्या सोयी सुविधा मिळणार? पुण्यातील 113 वर्षे शैक्षणिक परंपरा असलेल्या पुणे विद्यार्थी गृह या संस्थेच्या माध्यमातून सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रमांची सोय असून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या लॅबोरेटरीजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना हॉस्टेल उपलब्ध असून यासोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सोयदेखील केली जाते. भारतात आणि परदेशातही आज संस्थेचे विद्यार्थी मुद्रण क्षेत्रात अभिमानाने उच्चपदी कार्यरत असून काहींनी स्वतःचे व्यवसायही सुरू केलेले आहेत. चौकशीसाठी संपर्क कसा साधाल?  1786, क्रांतिवीर वासुदेव फडके पथ, पुणे, महाराष्ट्र 411030 या पत्त्यावर संपर्क करू शकता किंवा https://www.punevidyarthigriha.org/ वेबसाईटला भेट देऊन माहिती घेऊ शकता. अधिक संपर्कासाठी (020) 24470573, 24470927, 24479058 क्रमांकावर फोन करू शकता. तसेच  info@punevidyarthigriha.org हा या संस्थेचा ईमेल आहे. 
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Pune, जॉब

    पुढील बातम्या