मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

5 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेली कार, अन् मग..; पुण्यातील एस एम जोशी पुलावरील थरारक घटनेचा Video

5 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेली कार, अन् मग..; पुण्यातील एस एम जोशी पुलावरील थरारक घटनेचा Video

आता एस एम जोशी पुलाखालील रस्त्यावरील थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.  रात्री 1 वाजून 46 मिनीटांनी एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती मिळाली (Pune Rain)

पुणे 12 ऑगस्ट : महाराष्ट्रात पुन्हा पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबईत गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या दरम्यान गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचंड मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्यात आता पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुण्यात मुठा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील भिडे पुलावर पाणी पाणी जमा झाल्याने पुलावरील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. यापाठोपाठ आता एस एम जोशी पुलाखालील रस्त्यावरील थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुण्यात भिडे पूल पाण्याखाली, अनेक वाहनं अडकली, अंगावर काटा आणणारे Live Video रात्री 1 वाजून 46 मिनीटांनी एस एम जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर एरऺडवणा केंद्राची मदत पोहचताच दलाच्या जवानांनी रोप, लाईफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून टाटा टिगोरो (MH 48 6151) या गाडीजवळ जात गाडीमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढलं. अधिक माहिती घेतली असता सदर गाडी आणि गाडीतील व्यक्ती मूळच्या पालघर येथील असून पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. ते रजपूत विटभट्टीकडून कारमध्ये पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली होती. दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत आत अडकलेल्या व्यक्तींची सुखरूप सुटका केली. पुणे : मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, भिडे पूलही पाण्याखाली जाण्याची भीती यात वऺचिका लाल वाणी वय 13, प्रिया लाल वाणी वय 22, कुणाल लाल वाणी वय 28, कपिल लाल वाणी वय 21, कृष्णा लाल वाणी वय 08 या व्यक्तींची सुखरूप सुटका केली गेली. या कामगिरीमध्ये एरऺडवणा, जनता वसाहतच्या फायर गाड्या आणि सेंट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू व्हॅनची मदत झाली. यात गाडीमध्ये अडकलेल्या २ महिला आणि ३ पुरुषांची सुखरुप सुटका केली गेली. यात अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, चालक ज्ञानेश्वर खेडेकर, जवान किशीर बने, दिलीप घडशी, संदिप कार्ले यांनी विशेष कामगिरी बजावली
First published:

Tags: Pune rain, Shocking video viral

पुढील बातम्या