मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune: पत्नीला ड्रायव्हिंग शिकवताना सुटला ताबा, कारसह विहिरीत कोसळलं जोडपं, बायकोचा दुर्दैवी अंत

Pune: पत्नीला ड्रायव्हिंग शिकवताना सुटला ताबा, कारसह विहिरीत कोसळलं जोडपं, बायकोचा दुर्दैवी अंत

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Accident in Pune: पुण्याजवळील शिरूर याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीला कार शिकवत असताना, अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने एका मोठा अपघात घडला आहे.

पुणे, 15 डिसेंबर: पुणे (Pune) जिल्ह्याच्या शिरूर येथे एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी पत्नीला कार शिकवत असताना, अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने एका मोठा अपघात (car accident) घडला आहे. या अपघातात कार विहिरीत पडून महिलेचा जागीच मृत्यू (Wife died in car accident) झाला आहे. मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वर्षा दीपक आदक असं कार अपघातात मृत पावलेल्या 30 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी पती दीपक प्रभाकर आदक यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी दीपक हे आपल्या पत्नीला कार शिकवण्यासाठी तिला केंदूर येथील करंदी गावातील पऱ्हाडवाडी रस्त्यावर घेऊन गेले होते. पत्नीला कार शिकवत असताना, अचानक समोरून एक दुचाकी आली.

हेही वाचा-सेक्ससाठी नकार दिल्याने गाठला क्रूरतेचा कळस, पत्नीला जिवंतपणीच दिल्या नरक यातना

यावेळी पती दीपक यांनी पत्नी वर्षा यांना कारचा ब्रेक दाबायला सांगितला. घाबरलेल्या वर्षा यांनी घाईघाईत ब्रेक ऐवजी ऍक्सिलेटर दाबला. त्यामुळे कार थेट बाजूला असलेल्या एका विहिरीत जाऊन कोसळली. यावेळी दीपक यांनी कारमध्ये असताना पत्नीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कारमधून बाहेर येता आलं नाही. त्यामुळे फिर्यादी दीपक स्वत: कारमधून बाहेर आले आणि त्यांनी झटापट करत पत्नीला ओढून कारबाहेर काढलं.

हेही वाचा-नागपूर: संपत्ती हडपून लेकांनी सोडलं वाऱ्यावर, कॅन्सरग्रस्त आईच्या नशिबी वनवास

यानंतर दीपक यांनी विहिरीतील पाईपला पकडून मोठ्याने आरडाओरड केली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी दोघा पती पत्नीना विहिरीतून बाहेर काढलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेत वर्षा यांचा नाकातोंडात पाणी गेल्याने दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Accident, Crime news, Mumbai